Shocking Incident : लव्ह मॅरेज केलं, बायको तडक माहेरी गेली; नवऱ्याची सटकली; भररस्त्यातून फिल्मी स्टाइलनं अपहरण, VIDEO

Shocking Incident in nashik : लव्ह मॅरेज केलेल्या तरुणाने बायकोचं अपहरण केलं. भररस्त्यातून तरुणाने बायकोचं अपहरण केलं.
nashik crime
husband kidnap wife Saam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये नवऱ्याने बायकोचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. प्रेम विवाहाननंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीचं पतीकडून मित्रांच्या मदतीने अपहरण केलं. नाशिकच्या पांगरी बसस्थानकाजवळ हा प्रकार घडला आहे. अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या संपूर्ण प्रकारानंतर खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये प्रेम विवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीकडून मित्रांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. १९ वर्षीय विवाहित महिला ही आईसोबत रस्त्याने जात असताना पतीने मित्रांच्या मदतीने अपहरण केलं. सासूला मारहाण करून पत्नीचं अपहरण केलं.

nashik crime
Crime News: लग्नाचे आमंत्रण दिले नाही, नाराज मित्रांनी नवरदेवाचं घर गाठलं; वडिलांना मारहाण करत गोळी झाडली

अपहरणाचा थरार कॅमेरात कैद

भांडण झाल्याने पत्नी माहेरी निघून आल्यानं पतीने टोकाचं पाऊल उचललं. पतीने सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ प्रकार घडला आहे.अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

nashik crime
Titwala Crime: होळी खेळताना मित्रांची मस्करी जीवावर बेतली, गुदद्वारात उच्च दाबाच्या पाण्याचा फवारा; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली. अपहरण करणाऱ्या वैभव पवार या पती विरोधात सिन्नरच्या व्हावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीच्या फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

nashik crime
Maharashtra heatwave : महाराष्ट्राला उष्माघात, उष्णतेची लाट होरपळून काढणार, उन्हामुळे मृत्यू वाढणार

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या व्हावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवऱ्याने बायकोचं अपहरण केलं. बायको रस्त्यावरून चालत होती. नवरा कारने आला. एक जण कारमधून उतरल्यानंतर महिलेच्या दिशेने धावला. नवऱ्याच्या साथीला त्याचे मित्र देखील होते. बायकोला कारमध्ये बसवलं. यावेळी सासूला देखील मारहाण करण्यात आली आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

रस्त्यावर कुणीही नव्हतं. त्यामुळे मदतीला देखील कुणी धावलं नाही. त्यामुळे नवरा बायकोचं अपहरण करण्यास यशस्वी झाला. मात्र, काही तासांत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com