Nashik News: नाशिक येथील पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग; मोठ्या प्रमाणात वित्तहानी, VIDEO

Massive Fire Breaks Out at Bamboo Warehouse: नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना आज घडली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

पिंपळगाव शहरातील एका बांबू गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. आगीने इतका रौद्र रूप धारण केले की, आसपासची काही दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, कुठलीही जीवितहानी झाल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. अधिक तपास प्रशासन आणि पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com