Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावर मारामारी, चार जणांनी कर्मचाऱ्याला धुतला, व्हिडीओ

Latur Petrol Pump Viral Video: लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारी पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून वाद झाला. चार जणांनी पंप कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Published on

लातूरच्या औसा तालुक्यात किरकोळ कारणामुळे चार जणांमध्ये मारामारी झाली आहे. लातूरमधील किल्लारी येथे पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चार जणांची किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाली आणि नंतर त्यांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाण केल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस ठाण्यात देखील या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे

 Viral Video
Viral Video: पुण्याच्या आजींचा माधुरी दिक्षीत सारखा भन्नाट डान्स, गणपतीसमोरचा व्हिडीओ पाहिलात का?

लातूरमधील किल्लारी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चार जण गेले होते. दरम्यान त्यांचा कर्मचाऱ्यासोबत वाद झाला आहे. नंतर कर्मचाऱ्याला त्यांनी बेदम मारहाण देखील केली आहे.दरम्यान या घटनेनंतर पंपावर एकच गोंधळ झाला या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चार जणांनी कर्मचाऱ्याला बेदम मारलं आहे. ही घटना का घडली. यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कर्मचाऱ्यांना मारण्यांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस तपास सुरू आहे.

नेहमीच अश्या घटना घडत असतात. क्षुल्लक कारणावरून मारामारी सुरू होते मात्र यामुळे एखाद्याचा जीव देखील धोक्यात जाण्याची शक्यता असते. यामुळे कोणत्याही ठिकाणी मोठे पाऊल उचलण्याआधी योग्य काळजी घ्यावी

 Viral Video
Viral Video: 'ये दोस्ती हम नही छोडेंगे..' आजारी मित्राला सलाईन घेऊन दुचाकीवर बसून नेले, १६ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com