Viral Video: 'ये दोस्ती हम नही छोडेंगे..' आजारी मित्राला सलाईन घेऊन दुचाकीवर बसून नेले, १६ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल

Madhya Pradesh Viral Video: ग्वाल्हेरमध्ये घडलेली ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आजारी तरुणाला सलाईनसह मित्रांनी दुचाकीवर फिरवले.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. रूग्णालयात आजारी असलेला तरूण चक्क मित्रांसह दुचाकीवर फिरताना दिसत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे आरोग्याच्या काळजीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

Viral Video
Viral Video: आधी हात जोडून नमस्कार केला, मग एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या; फॉरेनरने जिंकली सर्वांचीच मने

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण रूग्णालयात दाखल असतात मित्रांसोबत दुचाकीवरून फिरायला गेला आहे. मध्यप्रदेशच्या झाशी रोड पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. एक आजारी रूग्ण हा आपल्या मित्रासोबत दुचाकीने फिरायला जात आहे. त्याच्या हातात सलाइन दिसतेय. मागे बसलेल्या तरूणाने सलाइन बॉटल हातात पकडली आहे. तिघेजण दुचाकीवरून जाताना दिसत आहेत.

माहितीनुसार, आजारी तरूणाला रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याने त्याच्या मित्रांना बोलावले दोन मित्रांनी त्याला दुचाकीवर बसवून रूग्णालयाबाहेर नेले आहे. काही वेळ दुचाकीवर फिरवून आणल्यानंतर त्यांनी त्या तरूणाला पुन्हा रूग्णालयात आणले आहे.सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे केवळ निष्काळजीपण दिसून येत आहे. यामुळे रूग्णालय व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आजारी रूग्णालयाला सलाईन असताना बाहेर घेऊन जाणे हे अत्यत धोकादायक ठरू शकते. असे कृत्य केल्याने इतरांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो.

Viral Video
Viral Video: भगवान शंकराची भूमिका साकारताना कलाकार अचानाक कोसळला, स्टेजवरच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com