
उत्तरप्रदेशमच्या तामकुहीराज येथील डोलमेळा झांकीमध्ये धक्कादायक घडना घडली आहे. डोलेमेळ्यात १६ आखाड्यांनी काढलेल्या झांकीत भगवान शंकरांची भूमिका साकारणारा कलाकार सादरीकरणादरम्यान अचानक स्टेजवर पडला आणि बेशुद्ध झाला आहे. याचदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे यात्रेत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तामकुहिराज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत कलाकाराचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
तामकुहीराज शहरात दोन दिवसीय डोलामेळा उत्सव असतो. या उत्सवात विविध प्रदर्शन आणि नृत्याचे आयोजन केले जाते. दरम्यान तामकुहीराजच्या या मेळ्यात धुरिया एमिलियाच्या छत्रपती शिवाजी महाराज आखाडा वन यांनी काढलेल्या झांकीत, भगवान शंकराची भूमिका साकारणारा अचानक स्टेजवरून खाली पडला आहे. यावेळी त्याचे इतर सहकारी कलाकार त्याच्या मदतीसाठी धावले आहेत. तात्काळ त्याला तामकुहीराज येथील सीएचसी रूग्णालयाक नेण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांच्या तपासणीनंतर मुलाला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टम अहवाल मिळाल्यानंतर घटनेची योग्य आणि अचूक माहिती उपलब्ध होईल. या प्रकारणात पोलिसांचे लक्ष असून आवश्यक ती कारवाई केली जात आहे.