Viral Video : फ्रीजमधील जेवण खाताय, तर पडाल आजारी? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

frozen food side effects : अनेकांना फ्रीजमध्ये जास्त दिवस अन्नपदार्थ, फ्रोजन मांस, मच्छी ठेवण्याची सवय असते. याच फ्रिजमधील लिस्टेरिया बॅक्टेरिया आजारी पडण्याची शक्यता असते.
फ्रीजमधील जेवण खाताय, तर पडाल आजारी? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ
Frozen Ice Is Formed By Freezing WaterSaam Tv
Published On

मुंबई : फ्रीजमध्ये जास्त दिवस अन्नपदार्थ, फ्रोजन मांस, मच्छी ठेवत असाल तर सावध व्हा. या पदार्थांमुळे फ्रीजमध्ये लिस्टेरिया बॅक्टेरिया होऊन तुम्ही आजारी पडू शकता. सीडीसीनुसार, अमेरिकेत लिस्टेरिया बॅक्टेरियामुळे मृत्यू होण्याचं तिसरं प्रमुख कारण आहे...प्रति वर्ष अमेरिकेत 260 लोकांचा मृत्यू होतो...गेल्या महिन्यात 9 जणांना जीव गमवावा लागलाय तर बरेच जण आजारी पडल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतायत.

हा खळबळजनक दावा केल्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली. बरेच जण फ्रीजमध्ये पदार्थ साठवून ठेवत असतात. त्यामुळे याची सत्य माहिती सांगणं गरजेचं आहे. आरोग्याचा विषय असल्यामुळे आम्ही या दाव्याची सविस्तर पडताळणी केली. आमच्या टीमने रिसर्च केला त्यावेळी अनेक वेबसाईट्समध्ये लिस्टेरिया बॅक्टेरिया घातक असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आम्ही या दाव्याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली.

फ्रीजमधील जेवण खाताय, तर पडाल आजारी? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ
Viral News: स्मोकी पान खाल्ल्यानं आतड्याला होतात छिद्र? 12 वर्षांच्या मुलीचा जीव धोक्यात, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

फ्रीजमधील अन्न खाल्ल्याने काय होतं?

फ्रीजमध्ये जास्त दिवस अन्नपदार्थ ठेवल्याने बॅक्टेरियामुळे आजार उद्धभवतात.

विषबाधा, डोकेदुखी, अंगदुखी, डायबिटीज, शुगरसारखे आजार होतात.

फ्रीजमध्ये लिस्टेरिया बॅक्टेरिया असतो फ्रीजची स्वच्छता ठेवणं गरजेची असते.

शिजवलेले पदार्थ, मच्छी जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नये.

गर्भवती महिलांना लिस्टेरिया बॅक्टेरियाचा धोका अधिक असतो.

कच्चं दूध, कापलेली फळं, आईस्क्रीम, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

लिस्टेरिया बॅक्टेरियामुळे अमेरिकेतील कॅलिफोर्निया, टेक्सासमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला.

फ्रीजमधील जेवण खाताय, तर पडाल आजारी? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ
Viral News : भर रस्त्यात खुर्चीत रुबाबात बसला, मागून आलेल्या ट्रकने दिली जोरदार धडक अन्...VIDEO

फ्रीज गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ करत राहावं. लिस्टेरिया बॅक्टेरिया थंड तापमानात जास्त वाढतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत फ्रीजमध्ये शिळे अन्नपदार्थ, मांस जास्त दिवस ठेवणं जीवावर बेतू शकतं हा दावा सत्य ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com