ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लेमन टी तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
लेमन टी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरात अँटि-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन्सची कमतरता भासत नाही.
लेमन टीचे रिकाम्या पोटी नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
लेमन टी रिकाम्या पोटी प्यायल्यामुळे तुमचे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते त्यासोबतच कोणताही संसर्ग होत नाही.
लेमन टी रिकाम्या पोटी प्यायल्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते आणि पोटाचे आरोग्य निरोगी ठवते.
लेमन टीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
लेमन टीमध्ये फलेव्होनॉइड्स आढलतात ज्यामुळे शरीरातील रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहाण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.