Priya More
जेवण करताना ते उजव्या हाताने करावे. डाव्या हाताने जेवण करू नये असा सल्ला दिला जातो.
डाव्या हाताने जेवण करू नये यामागे अनेक कारणं आहेत. डाव्या हाताने जेवण करणे चांगले नसते.
डाव्या हाताने जेवण न करण्यामागे सांस्कृतिक, धार्मिक आणि आरोग्यविषयक कारणे धर्मग्रंथात सांगितली आहेत.
हिंदू धर्मात उजव्या हाताला शुभ आणि पवित्र मानले जाते. धार्मिक विधी, पूजा, हवन करताना उजव्या हाताचा वापर केला जातो.
भोजन करणे हे देखील एक पवित्र कार्य मानले जाते. ज्यामध्ये अन्न घेण्यासाठी उजव्या हाताचा वापर करणे योग्य मानले जाते.
अनेक आध्यात्मिक विश्वासांनुसार, शरीराची उजवी बाजू सकारात्मक उर्जेशी आणि डावी बाजू नकारात्मक उर्जेशी संबंधित मानली जाते.
उजवा हात सकारात्मकतेला चालना देणारा असतो. त्यामुळे उजव्या हाताने जेवणाचा सल्ला दिला जातो.
उजव्या हाताने जेवण केल्यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
डाव्या हाताने जेवण करणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करते.
भारतीय परंपरेत डाव्या हाताला अपवित्र मानले जाते. कारण त्याचा वापर शरीराच्या स्वच्छतेसाठी म्हणजे शौचाला गेल्यावर केला जातो.
उजव्या हाताचा वापर करणे स्वच्छता आणि शुद्धतेच्या दृष्टीकोनातून योग्य मानले जाते.