Viral News: स्मोकी पान खाल्ल्यानं आतड्याला होतात छिद्र? 12 वर्षांच्या मुलीचा जीव धोक्यात, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Smoking Paan Viral News: तुम्ही जर पान खात असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी..स्मोकी पान खाल्ल्यानं तुमचा जीवही जाऊ शकतो. सोशल मीडिय़ात याबाबत एक मेसेज व्हायरल होतोय.
स्मोकी पान खाल्ल्यानं आतड्याला होतात छिद्र? 12 वर्षांच्या मुलीचा जीव धोक्यात, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Smoking Paan Viral NewsSaam Tv
Published On

जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकिन असतात. त्यामुळे तोंडाची चव वाढते. पानपट्टीवाल्याकडे कलकत्ता पान, मघई पान, बनारस पान असे पानाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. अलिकडे स्मोकी पानाची खूपच चलती आहे. लग्नकार्यापासून ते पार्टीपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच जण स्मोकी पान आवडीनं खातात.

पानातून निघणारा धूर पाहिल्यानंतर हे पान खाण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. मात्र हेच स्मोकी पान तुमच्या जिवावर उठू शकतं. स्मोकी पान खाल्ल्यानं एका 12 वर्षांच्या मुलीच्या आतड्याला छिद्र पडल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय, हे जाणून घेऊ...

स्मोकी पान खाल्ल्यानं आतड्याला होतात छिद्र? 12 वर्षांच्या मुलीचा जीव धोक्यात, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Viral Video : पठ्ठ्याच्या हिंमतीला सलाम, चक्क मगरीला डस्टबिनमध्ये पकडले, थरारक व्हिडिओ व्हायरल!

व्हायरल मेसेज

बंगळुरूत एका 12 वर्षांच्या मुलीनं स्मोकी पान खाल्लं आणि तिच्या आतड्याला होल पडलं. या मुलीवर तातडीने उपचार करण्यात आले. त्यामुळे तिचा जीव वाचला. अनेकजण स्मोकी पानाचे चाहते आहेत. लहान मुलं, महिलाही हे पान आवडीनं खातात. त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा खरा आहे का? साम टीव्हीनं याची पडताळणी केली.

व्हायरल इन्व्हेस्टिगेशन

स्मोकी पानात सुपारी, कात, गुलकंद, गोड चटणी, वेलची असे पदार्थ असतात. याशिवाय त्यातून धूर येण्यासाठी लिक्विड नायट्रोजन मिसळलं जातं. नायट्रोजन लिक्विड आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे आतड्याला होल पडू शकतो, तोंडाचे विकार होऊ शकतात. तुमचं जठर खराब होऊ शकतं.

स्मोकी पान खाल्ल्यानं आतड्याला होतात छिद्र? 12 वर्षांच्या मुलीचा जीव धोक्यात, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Viral Video : व्वा छोटे उस्ताद!चिमुकल्याने चक्क बॉक्सला बनवला ढोल अन् वाजवला;पाह VIDEO

फायनल व्हीओ - त्यामुळे आमच्या पडताळणीत स्मोकी पान खाल्ल्यानं आतड्याला छिद्र पडत असल्याचा दावा सत्य ठरलाय. मजा म्हणून तुम्ही स्मोकी पान खाता. मात्र त्यातील पदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुले तुमचा जीवही जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com