Viral Video : व्वा छोटे उस्ताद!चिमुकल्याने चक्क बॉक्सला बनवला ढोल अन् वाजवला;पाह VIDEO

Viral Video : सोशल मिडियावर कायम लहान मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात सध्या एका चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.जो तुम्ही नक्कीच पाहिला असेल.
Viral Video
Viral Video Saam Tv
Published On

सध्या सर्वत्र गणशोत्सव आगमाने वेध सुरु आहेत. मुंबई शहरासह सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमन सोहळा सुरु आहे. गणशोत्सवाच्या सुरुवातीपासून प्रत्येक प्रत्येक व्यक्तीमध्ये तयारीची लगबग सुरु आहे. कुठे गणपती बाप्पासाठी शहरात मंडप घालण्याचे सुरु आहे तर कुठे गपणती बाप्पासाठी मुर्ती घेण्याची लगबग.मात्र गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला अनेक ढोल पथक आपल्याला पाहायल मिळतात,सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात ढोल पथकाच्या सरावाच्या वेळी एका चिमुकल्या उत्साह पाहायला मिळत आहेत.

Viral Video
Viral Video: भर रस्त्यात पोरींचा राडा! मुली मिळून एका मुलीला जबर मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल

व्हायरल(Viral) व्हिडिओत आपल्याला काही तरुण ढोल वाजवण्याचा सराव करत आहेत. अशात तुम्ही व्हिडिओ नीट पाहिले तर या असंख्य तरुणांमध्ये एक चिमुकला आहे ,ज्याने गळ्यात एक रिकामा बॉक्स अडकवला आहे आणि एका काठीने या तरूणांसारखा ढोल वाजवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला या चिमुकल्याचा जोश दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया(Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @vighnaraje__pratishthan या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत ''जोश'' असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलेले आहे.व्हिडिओ १४ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आल्यानंतप आता पर्यंत व्हिडिओला ४०हजारांच्या घरात लाईक्स आले आहेत शिवाय व्हिडिओला अजून व्ह्यूज मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर असंख्य अशा कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Viral Video
Viral Video : बिहारी बाबूचा नादख खुळा! मेट्रोत जागा न मिळाल्याने केला हटके जुगाड; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com