Viral Video: बापरे! गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; पाण्यात घेतली उडी; VIDEO पाहून उडेल थरकाप

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात प्रेमात विश्वासघात झाल्याने एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. मात्र काय घडले ते पहाच.
Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Chhattisgarh Viral Video: प्रेम ही एक अतिशय गोड भावना आहे.मात्र नात्यात असताना प्रेमासोबत विश्वास असणं अतिशय महत्त्वाचे असते.कोणतही नातं टिकवण्यासाठी समोरच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.मात्र जेव्हा हा विश्वास जेव्हा समोरचा तोडतो तेव्हा अनेक भयंकर घटना घडतात.सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात प्रेमात विश्वासघात मिळाल्याने तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे.

सोशल मीडियावर जोडप्यांचे अनेकदा भाडंणाचे व्हिडिओ(Video) व्हायरल होतात तर कधी भर रस्त्यात हाणामारीचेही व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले आहेत.मात्र अनेकदा काही अशा भयंकर घटना घडतात ज्याने संपूर्ण देश हादरुन जातो.मात्र सध्या व्हायरल होत असलेला तरुणाचा व्हिडिओही असाच आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण एका उंच धबधब्यावर उभा असतो,मात्र या तरुणाला पाहून तिथे असलेले सर्व पर्यटक आरडा-ओरड करत असतात.त्यानंतर काही वेळाने तो तरुण उंच धबधब्यावरुन खाली पाण्यात उडी मारुन स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न करतो.मात्र काही नाविकाने तरुणाचा जीव वाचवला आहे.

व्हायरल होत असलेला हा धक्कादायक(Shocking) प्रकार छत्तीसगढ़मधील असल्याचे समजत आहे,मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही.मात्र हा सर्व व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील 'dhakad__pil' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हा प्रकार पाहणारा प्रत्येकजण हैराण झालेला आहे शिवाय अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''उगाच नाटकी'' तर काही यूजर्संनी कमेटमध्ये लिहिले आहे,''गरज काय असतं असं करायची''अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Shocking Viral Video: हा काय माणूस हाय! दारु प्यायला अन् खांद्यावर विषारी साप घेऊन रस्त्यावर धिंगाणा, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com