

लग्न समारंभ म्हटलं की सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. आपण यामधील क्षण लक्षात रहावे यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु असं करणं नवऱ्याला काहीसं महागात पडल्याचं दिसून येतंय. तर झालं असं की, नवऱ्याने नवरीला उचलून स्टेजवर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच दोघांचा तोल जाऊन ते खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत.
व्हायरल क्लिपमध्ये लग्नसोहळा सुरु आहे. वरमाळा घालण्यापूर्वी नवरा ‘Pushpa’ चित्रपटातील प्रसिद्ध स्टेप करत पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतो. लग्नाला उपस्थित मंडळी टाळ्या वाजवत असताना तो स्टेजवरून खाली उतरतो आणि नवरीला उचलून पुन्हा स्टेजवर नेण्याचा प्रयत्न करतो.
सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरु असतं. मात्र स्टेजच्या पायऱ्या चढताना त्याचा तोल जातो आणि नवरा-नवरी दोघंही खाली पडतात. आजूबाजूला उभे असलेले नातेवाईक आणि मित्र तातडीने त्यांच्या मदतीसाठू पुढे धावतात. यावेळी दोघांनाही कोणती गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर @hindugj या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. घटनेचं नेमकं ठिकाण स्पष्ट झालं नाहीये. मात्र हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर भरपूर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओवर अनेकांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, 'इम्प्रेशन मारायला गेला आणि स्वतःच अडचणीत सापडला.' तर दुसऱ्याने त्याची मजा घेत म्हटलंय की, 'लग्नाच्या दिवशीच नवऱ्याने ओरडा खाण्याची तयारी करून ठेवली.'
(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.