Viral video: भारतात वडा पाव का आहे लोकप्रिय? परदेशी व्हिडिओ ब्लॉगरने सांगितलं कारण
Viral video

Viral video: भारतात वडापाव का आहे लोकप्रिय? परदेशी व्हिडिओ ब्लॉगरने सांगितलं कारण

Viral video: वडापाव म्हणजे मुंबईची शान. मुंबईच्या वडापावची जगात तोड नाही. आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्यावर आवर्जून तेथील स्थानिक वडापावची चव चाखत असतो. असाच व्हिडिओ ब्लॉगरचा वडापाव खात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

गोवा हे ऑल टाइम फिरण्याचे उत्तम ठिकाण आहे. गोवा हा समुद्रकिनाऱ्यासोबतच तेथील खाद्यसंस्कृतीसाठी देखील प्रसिद्ध आहे. येथे सर्व प्रकारचे चवदार पदार्थ खायला मिळतात. युक्रेनियन व्हिडिओ ब्लॉगर स्वितलाना हेन्को ही सध्या गोवा ट्रीपवर आहे. तिनेसुद्धा गोव्यात वडापाव खाण्याचा आनंद घेतला. नुकताच या परदेशी व्हिडिओ ब्लॉगरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ गोव्यातील एका जुन्या वडापाव विक्रेत्याचा आहे

या युक्रेनियन व्हिडिओ ब्लॉगरने पहिल्यांदाच गोव्यातील लोकल दुकानात जाऊन वडापाव खाल्ल्याचा अनुभव शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, युक्रेनियन व्हिडिओ ब्लॉगरने वडापाव खाऊन त्याची मनापासून कौतुक केलंय. ती म्हणते की, वडापाव खूप चविष्ट आणि सोफ्ट आहे. हा वडापाव खाल्ल्यावर मला कळाले की, 'वडापाव भारतात एवढा प्रसिद्ध का आहे' असे ती परदेशी व्हिडिओ ब्लॉगरने दुकानातील दुसऱ्या एका ग्राहकाशी बोलताना म्हणतेय. दुसरा ग्राहकही वडापावचे कौतुक करत तिच्या वडापावचे पैसे देखील देतो. सोशल मीडियावरील या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या युक्रेनियन व्हिडिओ ब्लॉगरने वडापाव विक्रेत्याशी संवाद साधला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील वडापाव विक्रेत्याचे नाव रुपेश आहे. जवळपास ४० ते ५० वर्षांपासून ते गोव्यात वडापाव विकत आहेत. गोव्याला आल्यावर त्यांच्या या वडापाव दुकानाला पर्यटक आवर्जून भेट देतात. वडापावचा आस्वाद घेतात. हे गोव्यातील प्रसिद्ध दुकान आहे. या दुकानात वडा पाव २० रुपयांना मिळतो.

हा व्हिडीओ @svitlanahaienko या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर असंख्य नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कमेंट्समध्ये नेटकरी वडापाव विक्रेत्याची प्रशंसा करीत आहेत. तर युक्रेनियन व्लॉगरला भारतीय पदार्थ आवडत असल्यामुळे तिचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे.

Viral video: भारतात वडा पाव का आहे लोकप्रिय? परदेशी व्हिडिओ ब्लॉगरने सांगितलं कारण
QR कोडने Russian Influencer शोधतेय भारतीय नवरा, हटके प्रपोजल पाहून कॉमेंट्स सुसाट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com