नवरदेवाचा पायजमा सुटला, मंडपात हशा पिकला, पाहा VIDEO

Groom Pajama Falls During Jaymala Viral Video: लग्नातील जयमाला सोहळ्यात नवरदेवाचा पायजमा अचानक सुटल्याने भर मंडपात हशा पिकला. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहा नेमकं काय घडलं.
A hilarious moment as the groom struggles after his pajama slips during the wedding ceremony, leaving guests in splits.
A hilarious moment as the groom struggles after his pajama slips during the wedding ceremony, leaving guests in splits.saam tv
Published On

लग्नाचा मांडव, सनई-चौघाड्यांचे सूर, नटलेले पाहुणे आणि जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण... अशा वातावरणात प्रत्येक नवरदेवाला प्रत्येक नवरदेवाला आपण 'हिरो' दिसावं असं वाटतं. पण कधीकधी नशिबात काहीतरी वेगळंच असतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका दुर्दैवी पण अतिशय गमतीशीर घटनेचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, यावेळी नवरदेवाला अतिउत्साह चांगलाचा महागात पडला.

नेमकं काय घडलं?

लग्नातील सर्वात महत्वाचा विधी म्हणजे 'जयमाला' नवरदेव आणि नवरी एकमेकांना हार घालण्यासाठी स्टेजवर उभे होते, मित्र मंडळीचा आरडाओरडा आणि गाण्यांच्या तालावर नवरदेवही चांगल्याच फॉर्ममध्ये होता. मात्र, नवरीला हार घालण्यासाठी नवरदेवाने जसा हात वर केला आणि थोडी हालचाल केली, तसा त्याचा पायजमा अचानक खाली घसरला.

A hilarious moment as the groom struggles after his pajama slips during the wedding ceremony, leaving guests in splits.
विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

मांडवात एकच हशा!

भर मंडपात सगळ्या पाहुण्यांसामोर आणि कॅमेऱ्याच्या फ्लॅशलाईटमध्ये हा प्रकार घडल्याने नवरदेवाची मोठी फजिती झाली. क्षणभर काय झाले हे कोणालाच कळले नाही, पण दुसऱ्या क्षणी मांडवात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नवरदेवाने अत्यंत चपळाईने आपला पायजमा सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो पर्यंत जे व्हायचे ते झाले होते. बिचाऱ्या नवरदेवाला लाजल्यामुळे मान खाली घालावी लागली. तर नवरीलाही आपले हसू आवरता आले नाही, लग्नाची घाई आणि पायजम्याची नाडी कधी कधी अंगाशी येते अशी मिश्किल टिप्पणी नेटकरी या व्हिडिओवर करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com