हे आहेत हकीम बाबर आणि ही त्यांची बेगम...सध्या जगभरात या दोघांचीच चर्चा सुरू आहे. या दोघांनी निकाह केलाय. त्यामुळेच दोघेही इंटरनेटवर तुफान व्हायरल होतायेत. आता तुम्ही म्हणाल हकीम बाबर यांच्याकडे पाहिल्यानंतर हे शक्यच नाही...60 वर्षांच्या व्यक्तीसोबत एखादी तरूणी कसं लग्न करेल. तर हे अगदी खरंय...हकीम बाबर यांचं अल नूर हॉस्पिटल आहे. तिथंच ही तरूणी काम करते...तिचा घटस्फोट झालाय. अशातच बाबर महाशय तिच्या प्रेमात पडले आणि त्यांनी तिला प्रपोज केलं. महत्वाचं म्हणजे तिने त्यांना लगेच होकारही देऊन टाकला. आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं हीच तिची इच्छा होती.
बाबर यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. आपण दुसरं लग्न करतोय असं त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सांगताच तिनेही लग्नेच मान्यता देऊन टाकली. महत्वाचं म्हणजे दुसरं लग्न करण्यात गैर काय? असं सांगत त्यांनी जगभरातल्या इतर देशांची उदाहरणंही दिली आहेत.
दोघांच्या लग्नाचे व्हिडीओ पाहिल्यानंतर दोघेही खूपच आनंदात असल्याचं दिसतंय. पण या लग्नामुळे काही नेटीझन्सचा चांगलाच जळफळाट झालाय. त्यांच्याकडून या नवदाम्पत्याला ट्रोलही केलं जातं. पण म्हणतात ना प्रेमाला वयाचं बंधन नसतं. उगीच पाडगावकर नाही म्हणाले... त्याने प्रेम केलं, तिने प्रेम केलं, यात तुमचं काय गेलं?...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.