

Girls Driving scooty Viral Video: मुली नेहमीच चुकीच्या पद्धतीने स्कूटी चालवतात, असं म्हटलं जातं. स्कूटी चालवताना मुलींचे अनेक अतरंगी व्हिडिओ समोर आले आहेत. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहून पोट दुखेपर्यंत हसू येतं. आता देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही खळखळून हसाल. (Latest Marathi News)
सोशल मीडियावर मुलींचे आजवर अनेक अतरंगी व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. दुचाकी अथवा चारचाकी चालवताना त्याच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असते. अन्यथा मोठ्या अपघाताना तोंड द्यावं लागतं. रस्त्याने काही मुली ट्रीप्सी चालल्या होत्या. दुचाकीवर तीन मुली जात असताना त्यांचा तोल जातो. तोल जाऊन तिघीही जवळ असलेल्या नाल्यात कोसळतात.
नाल्यात दुचाकी पडताना त्यांना आपला तोल सावरता येत नाही. एकापाठोपाठ एक अशा तिघीही दुचाकीसह नाल्यात कोसळतात. नाल्यात पडल्याने मुली पूर्णता काळ्या पडतात. मुलींना पडलेलं पाहून रस्त्यावरील काही व्यक्ती त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतात. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात येते.
तरुणी नाल्यातून बाहेर पडल्यावर केसांपासून पायाच्या नखापर्यंत त्या संपूर्ण काळ्या झाल्या आहेत. तरुणींना नाल्यात पडल्याचं पाहून काहींनी त्यांचे व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेत. सदर व्हिडिओ अनन्या शर्मा या ट्वीटवर अकाउंटवर टाकण्यात आला आहे.
'पापा की परिया नालेमें गिर पडिया' असं या व्हिडिओवर लिहिण्यात आलं आहे. नेटकरी या व्हिडिओवर आता वेगवेगळ्या कमेटं करत आहेत. नाल्यात पडलेल्या मुली पाहून नेटकऱ्यांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.