Kolkata Metro Train Viral Video: प्रेयसीला मिठीत घेतलं अन्...; धावत्या ट्रेन समोर उडी; थरकाप उडवणारी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Kolkata Metro Train Viral Video: ही आपली शेवटची मिठी म्हणत प्रेयसीला जवळ घेतलं अन्...; धावत्या ट्रेन समोर घेतली उडी
Kolkata Metro Train Viral Video
Kolkata Metro Train Viral VideoSaam TV

Kolkata Metro Train Station: प्रेमात संपूर्ण जगाला हारवण्याची ताकत असते असं म्हणतात. मात्र अनेकदा जात, धर्म, आर्थिक परिस्थीती या सर्वांमुळे प्रेमी युगुलांना एकमेकांपासून वेगळं व्हावं लागतं. याचा काहींच्या मनावर मानसिक परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती नैराश्यात जातात. अशा परिस्थीत आयुष्य संपवण्याचे विचारही त्यांच्या मनात येतात.(Marathi News)

आता देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. कोलकाता येथे एका प्रेयी युगुलाने आपलं जीवन संपवलं आहे. तरुण मुलंमुली एकमेकांवर आंधळं प्रेम करु लागतात. आपल्या प्रियकराशिवाय आपलं आयुष्य बोगस आहे. आपण जगूच शकत नाही असे विचार त्यांच्या मनात येऊ लागतात. असाच विचार मनात घेऊन एका जोडप्याने मेट्रो ट्रेनसमोर उडी घेतली आहे.

Kolkata Metro Train Viral Video
Pune Crime News: लग्नाचं वचन देत तरुणीवर अत्याचार...; पुण्यातील संतापजनक घटना

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण प्रेमी युगुल कोलकाता रेल्वे स्टेशन जवळ उभं आहे. प्लॅटफॉर्मवर काही वेळाने ट्रेन येणार असल्याची सूचना येते. जशी ट्रेन समोर येते तसे हे दोघेही ट्रेनखाली उडी घेतात. तरुण आपल्या प्रेयसीला घट्ट मिठी मारतो. शेवटची मिठी समजून दोघेही एकमेकांना घट्ट पकडतात आणि रेल्वे रुळांवर पडतात.

ते खाली पडल्यावर दुसऱ्याच मिनीटाला मेट्रो ट्रेन येते. ट्रेन या दोघांच्या अंगावरून जाते. या घटनेची दृश्य प्लॅटफॉर्मवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. व्हिडिओमधील दृश्य काळजाचा थरकाप उडवणारी आहेत. व्हिडिओपाहून दोघांचाही मृत्यू झाला असावा असे वाटते. मात्र तसे नसून त्यांना या घटनेतुन वाचवण्यात आलं आहे.

शनिवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली असून मेट्रो कर्मचाऱ्यांनी तात्काळ दोघांच्या दिशेने धाव घेतली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com