Viral Video: खरं की खोटं? चक्क महिलेच्या कानात साप, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.ज्यात एका महिलेच्या कानात साप शिरलेला दिसत आहे,मात्र व्हिडिओ खरचं खरा आहे का खोटा ते पाहण्यासाठी तो व्हिडिओ पाहा.
Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Snake Viral Video: सोशल मीडियावर जगभरातील अनेक विचित्र घटना व्हायरल होत असतात.अनेकदा काही घटना अशा असतात त्यावर विश्वास ठेवणे ही अत्यंत कठीण होते.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे,ज्यावर कोणालाही विश्वास ठेवावा की नाही असे झाले आहे.व्हायरल होत असलेलल्या व्हिडिओमध्ये महिलेच्या कानात चक्क साप दिसून आलेला आहे.

साप(Sanke) असा एक प्राणी आहे,ज्याला जगभरातील प्रत्येकजण घाबरतात.साप जरी अनेक फूट लांब जरी दिसला तरी प्रत्येकांच्या अंगाचा थरकाप उडतो.सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यात कधी घराच्या बेडरुममध्ये साप आढळून आलेला आहे तर कधी चक्क शुजमध्ये,मात्र कधी अनेक व्यक्ती सापासोबत खेळ करताना दिसून येतात,मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे.पंरतु सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

महिलेच्या कानात दिसत असणाऱ्या सापाचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मव व्हायरल होत असून तो व्हिडिओ 'figenofficial1' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे आणि व्हिडिओ खरंच कधी पोस्ट केला या बाबत काही समजू शकलेले नाही,मात्र सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडिओ (Video)पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''खुपच भयानक आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''काय काय पाहावे लागेल'' तर काही यूजर्संनी कमेंट केली आहे,''कुठली आहे ही घटना'',अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Shocking Viral Video: माता न तू वैरिणी! चिमुकलीला अत्यंत क्रूरपणे मारहाण; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com