Viral Video: छोटा हत्ती झाला भजनात तल्लीन, ठेका घरत केला डान्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

Viral Video On Elephant: मंदिरात भजनाची धून ऐकून छोटा एलिफंट नाचू लागला आणि त्याचे गोंडस डान्स पाहून सर्वजण मोहित झाले. हत्तीचा हा आनंददायक डान्स तुम्हालाही आवडेल. हा व्हायरल व्हिडिओ एकदा नक्की पाहा.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे वेगवेगळ्या भावना निर्माण करतात. कधी आश्चर्य, कधी हसू, तर कधी भावूकपण. प्राण्यांसंबंधित व्हिडिओसुद्धा अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. सध्या एक हत्तीचा सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याने पाहणाऱ्यांचे हृदय जिंकले आहे. हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, लोक त्याच्या गोंडस आणि आश्चर्यकारक दृश्यांची प्रशंसा करत आहेत.

तुम्ही कधी लहान हत्तीला भजनावर नाचताना पाहिलं आहे का? नाही तर, हा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करेल. गुरुवायूर मंदिराने तिरुचेंदूर मंदिराला एक गोंडस हत्ती दिला असून, हा हत्ती खास आहे कारण त्याला गाण्यांच्या तालावर नाचायला आवडते. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, हत्ती भजनाच्या सुरात आपले शरीर हलवून नाचताना दिसला. या लहान हत्तीचे हे नृत्य पाहून सर्वच लोक थक्क झाले असून, त्याची गोंडसता सर्वांच्या हृदयात घर करीत आहे.

Viral Video
Viral Video: हाहाहा...झोपलेल्या माणसावर माकडाचा हल्ला, पुढे काय घडले ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा VIDEO

व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की, मंदिरात भजन सुरू होताच लहान हत्ती आनंदाने त्या तालावर नाचू लागतो. कधी त्याचे छोटे पाय टॅप होतात, तर कधी तो नाचताना आपल्या सोंड आणि कान हलवून आनंद व्यक्त करतो. हत्ती हे विशाल, शांत प्राणी असले तरी, या छोट्या हत्तीचे नृत्य पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामुळे चिमुकल्या हत्तीच्या गोंडस रूपाने अनेकांची मने जिंकली आहेत.

Viral Video
Viral Video: भारीच! युवकांना मागे टाकत लुंगी घालून काकांचा जबरदस्त डान्स; स्टेजवर डान्सचा धुरळा, पाहा VIDEO

छोट्या हत्तीचे नृत्य '@gargivach' या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले असून, गुरुवायूर मंदिराने तिरुचेंदूर मुरुगन मंदिराला हत्तीचे बाळ भेट दिले असल्याची माहिती दिली आहे. त्याला नाचायला फार आवडते असेही लिहिले आहे. हा व्हिडिओ आता 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक युजर्सने हत्तीच्या या अनोख्या नृत्यावर प्रतिक्रिया दिली आहेत. एका युजरने तो नाचत नाहीये, तो तणावात आहे असे लिहिले, तर दुसऱ्याने खूप गोड, या बाळाला इतकं छान नाचायला कोणी शिकवलं" असे म्हटले.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Viral Video: अश्विनी ये ना...या गाण्यावर चिमुकल्यानं केला भन्नाट डान्स, अशोक मामांनी देखील केलं कौतुक, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com