Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: दिल्ली मेट्रोत पुन्हा एकदा WWE; एकमेकांना फायटी मारत फोडलं तोंड, घटना कॅमेऱ्यात कैद

Delhi Metro Viral Video :दिल्ली मेट्रोत डान्स, गाणी, प्रेमवीरांचे, भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक दिल्ली मेट्रोतील तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published on

Delhi Metro Fight Video:

दिल्ली मेट्रो म्हणजे मनोरंजनाचा अड्डा असा म्हणायला हरकत नाही. दिल्ली मेट्रोत डान्स, गाणी, प्रेमवीरांचे, भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक दिल्ली मेट्रोतील तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Delhi Metro Fight Viral Video)

व्हायरल व्हिडिओत दोन लोकांमध्ये एका जागेवरुन भांडणे होताना दिसत आहे. व्हिडिओत दिल्ली मेट्रोत प्रवाशांनी गच्च भरलेली दिसत आहे. या प्रवाशांनी भरलेल्या गर्दीतदेखील दोन तरुणांमध्ये तुफान हाणीमारी होताना दिसत आहे.

या व्हिडिओत सर्वप्रथम एक तरुण दुसऱ्या तरुणाला कानाखाली मारतो आणि दरवाजापर्यंत नेताना दिसत आहे. त्यानंतर दुसऱ्या तरुणानेदेखील जबरदस्त मारहाण करण्यास सुरुवात केली. आजूबाजूचे लोक ही भांडणे थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु हे दोघेही थांबत नाही. तर अनेक लोक व्हिडिओ काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. (Delhi Metro)

Viral Video
Siddharth Chandekar: सिद्धार्थ, मिताली आणि सईचा 'कोंबडी पळाली 2.0' व्हिडीओ व्हायरल, पाहून पोटधरून हसाल

दिल्लीतील या व्हिडिओवर दिल्ली मेट्रो फाईट असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'हा थरारक अनुभव फक्त दिल्ली मेट्रोत अनुभवता येणार', 'दिल्ली मेट्रो म्हणजे भांडणाचे घर' अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. तर पोलिस यांच्यावर कारवाई कधी करणार? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत.

Viral Video
Wedding Viral Video: लग्नाच्या जेवणात पनीर नसल्यानं वऱ्हाड्यांनी केला राडा; खुर्च्या तोडल्या, पडदे फाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com