- बालाजी सुरवसे
तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे दागिन्यांच्या चाेरी प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या (tuljabhavani mandir sansthan) तक्रारीनंतर तुळजापूर पाेलिसांनी 4 महंतासह 7 जणांवर गुन्हा नोंदविला आहे. याबाबतची माहिती अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, धाराशिव) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)
तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट व इतर काही माैल्यवान दागिने गायब असल्याचा दागिने तपासणी समितीस आढळले हाेते. त्याबाबतचा अहवाल समितीने दोन महिन्यांपुर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिला हाेता.
त्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने कुणालाही पाठिशी न घालता या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी दागिन्यांची तपासणीसाठी नेमलेल्या मोजदाद समितीचे सदस्य तथा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम (amarraje kadam) यांनी केली हाेती.
दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने तुळजापूर पाेलिसांनी 4 महंतासह 7 जणांवर गुन्हा नोंदविला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महंत हमरोजीबुवा, गुरु चिलोजीबुवा, वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा या चार महंतासह मयत धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे व अज्ञात अशा 7 संशयितांवर तुळजापूर पोलिस ठाण्यात (कलम 420, 406, 409, 381 व 34 आयपीसी नुसार) गुन्हा नोंदविल्याची माहिती अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, धाराशिव) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.