Delhi Metro Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: दिल्ली मेट्रोत चोरीचा प्रयत्न फसला! सावध प्रवाशांनी चोरट्याला दिला जोरदार दणका, VIDEO आला समोर

Delhi Metro Viral Video: सध्या दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नेमके काय घडले ते पाहण्यासाठी तो व्हिडिओ एकदा नक्कीच पाहा.
Published on

Delhi Metro Theft Video: सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो म्हणजे नेटकऱ्यांच्या चर्चेचा मुद्दा कायम असतो.कायम प्रवाशांच्या विविध कारनाम्यामुळे दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात,त्यातच पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,मात्र ज्यात नेमके काय घडले ते एकदा तुम्ही पाहाच.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला एक मेट्रो स्टेशन दिसून येत आहे.काही वेळात मेट्रो स्टेशनवर एक मेट्रो येते आणि स्टेशनवर असलेले सर्व प्रवाशी मेट्रोमध्ये जाण्यासाठी गडबड करत असतात आणि मेट्रोच्या आतील प्रवासी बाहेर येत असतात.प्रवाशाच्या या गर्दीचा फायदा घेत एक महिला तुम्हाला तिच्या समोरच्या असलेल्या महिलेच्या बॅगमधून चोरी करण्याचा प्रयत्न करत असते,मात्र तीचा हा प्रयत्न काही प्रवाशांना समजतो आणि ते तिला पकडतात.सर्व प्रकार तेथील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

rohini_walee delhi_ghum_lo या इन्स्टाग्राम वअकाउंटवर दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ अपलोड करुन काही दिवस झाले,मात्र आतापर्यंत व्हिडिओला मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहेत तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.

दिल्ली मेट्रोतील(Delhi Metro) हा प्रकार पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''हे नवीनच पाहण्यासाठी मिळाले'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''अजून मारायला पाहिजे होते महिलांनी''तर काही यूजर्संनी कमेंट केली,''पोलिसांनी चांगलेच दणके देयला पाहिजे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: दिल्ली मेट्रोतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत; बसण्याच्या जागेवरून दोन प्रवासी भिडेल, Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com