Shocking Video: 'खतरों' के खिलाडी! दसऱ्याच्या स्वच्छतेसाठी महिला बनली स्पायडर मॅन; जुना VIDEO होतोय व्हायरल

Viral Video: घरातील साफसफाई करताना अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. सोशल मीडियावर त्या संबंधित व्हिडिओ अनेकदा व्हायरलही झालेले आहेत.
Shocking Video
Shocking VideoSaam Tv
Published On

आपल घर स्वच्छ असाव हे आपल्यापैंकी प्रत्येकाला वाटत असते. घर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण विशेष मेहनत घेत असतो. त्यात जर कोणता सण असल्यास साफसफाई करण्यासाठी महिला वर्गाचा उत्साह अतिशय निराळा असतो. घरातील कोपरा न कोपरा साफ करण्यासाठी महिला बारकाईने लक्ष ठेवतात. मग यात सोशल मीडियावर या संबंधित एका महिलेचा साफ सफाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात महिलेने साफसफाई करण्यासाठी भलतेच धाडस केलेले आहे. जो व्हिडिओ पाहून नेटऱ्यांच्या मनात धडकी भरलेली आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक अतिशय उंच इमारत दिसून येत आहे. मोजता येणार नाही एवढे या इमारतीत मजले आहेत. मात्र तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला तर दिसेल की, एक महिला आहे जी इमारतीतील एका रुमच्या बाल्कनीत आहे. मात्र मात्र व्हिडिओ जसा पुढे पुढे जाईल तसं दिसत आहे की, एक महिला बाल्कनीच्या नाही तर एक खिडकीच्या बाहेर उभी राहून साफ सफाई करत आहे. व्हिडिओच्या शेवटी दिसेल की कोणत्याही सुरक्षितेशिवाय सदर महिला साफसफाई करत आहे. सर्व व्हिडिओ(Video) समारेच्या इमारतीमधून एका नागरिकाने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो इन्स्टाग्रामवरील ''@chal_mumbai'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत व्हिडिओ मुंबईतील असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे नेमके समजले नाही मात्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्संनी लिहिले आहे की,''भलतच धाडस'' तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की,''एवढी काय साफसफाई करायची असते'' तर अनेकांनी आश्चर्यजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Video
Shocking Video : खळबळजनक! दरोडेखोरांनी अवघ्या २ मिनिटातच लुटले ४० लाखांचे दागिने; लुटमारीचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com