Spider Man in Railway Station: सध्याच्या चिमुकल्यांमध्ये कार्टून पाहण्याचे भयंकर वेड आहे. ज्या ज्या घरात लहान मुलं असेल त्या त्या घरात हमखास कार्टून लागत असणार हे नक्की. मुलींमध्ये बारबी डोल तर मुलांमधे विविध सुपर हिरो संबंधित कार्टून पाहण्यात येतात. त्यामधील सर्वात आवडीचे कार्टून कैरेक्टर म्हणजे स्पायडर मॅन. अगदी लहान मुलांपासून ते तरुणाईमध्ये स्पायडर मॅनवर आधारित चित्रपट आणि कार्टून पाहण्याच वेड जात नाही. जे चित्रपटात आणि जी कार्टून आहे ती माणसाने तयार केलेली इमेजिनेशन. मात्र या सर्वामधील स्पायडर मॅन तुम्हाला खरोखर दिसून आला तर ??? सध्या एका रेल्वेस्थानकावर चक्क स्पायडर मॅन दिसून आलेला आहे
सोशल मीडियावर आपल्याल रेल्वेमधील अनेक व्हिडिओ(Video) पाहण्यास मिळाली. एवढेच नाही तर रेल्वे(Railway) स्थानकातील अपघाताच्या घटनाही आपल्याला व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून बघण्यासाठी मिळतात, मात्र सध्या एका रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या तिकिटाच्या लाईनमध्ये स्पायडर मॅन उभा असलेल दिसून येत आहे. नक्की स्पायडर मॅन काय करत असेल तो तिथे पाहूयात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता, तुम्हाला एका रेल्वे स्थानका बाहेरील परिसर दिसून येत आहे पुढे व्हिडिओ जसा जाईल तसा एका रेल्वे स्थानका बाहेरील तिकिट काऊंटर दिसत आहे, जिथे काही प्रवाशी तिकिट काढण्यासाठी उभे आहेत त्यानंतर व्हिडिओत काही प्रवाशांसोबत एक स्पायडर मॅन दिसून येत आहे. स्पायडर मॅनने निळ्या आणि लाल रंग असलेला स्पायडर मॅनचा ड्रेस घातलेल आहे, मात्र तुम्ही या स्पायडर मॅनकडे नीट पाहिले असता दिसेल की याच्या पायात चक्क चप्पल आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ युटुब या मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे असून तो युटुबवरील ''@Mr Suraj'' या अकाउंटवर सात दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ नवी मुंबईतील ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून समजून येत आहे.
व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या संख्येने लाईक्स आणि अजूनही व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी बऱ्याच विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''पाठच्या काकू केवड्या लांब उभ्या आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''स्पायडरमॅन डाईटवर आहे'' अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.