Nagpur Crime: नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्णाचा चौघांवर हल्ला; दोघांचा मृत्यू

Nagpur Railway Station: नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सातवर हत्येचा थरार झाला. एका व्यक्तीने चौघांवर हल्ला केला यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. नागपूर लोहमार्ग पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
Nagpur Crime: नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्णाचा चौघांवर हल्ला; दोघांचा मृत्यू
Nagpur Railway StationSaam Tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर

नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार पाहायला मिळाला. एका व्यक्तीने चार जणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सातवर ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नागपूर लोहमार्ग पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सातवर एका मनोरुग्ण व्यक्तीने चौघांवर हल्ला केला. आरोपी मनोरुग्ण या चौघांनाही मारत सुटला होता. रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लाकडी राफटरने आरोपी त्यांच्यावर हल्ला करत होता. या हल्ल्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

Nagpur Crime: नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्णाचा चौघांवर हल्ला; दोघांचा मृत्यू
Nagpur School Bus Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली; अपघाताचं कारण आलं समोर

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हालवले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. गणेश कुमार डी (५४ वर्षे राहणार दिंडीगुल, तामिळनाडू) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. जयराम रामअवतार केवट (३५ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. नागपूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Nagpur Crime: नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्णाचा चौघांवर हल्ला; दोघांचा मृत्यू
Nagpur Viral Video : अंगावर थुंकणाऱ्या पोलिसाची दांपत्यानं लाज काढली; नागपुरातील VIDOE व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com