Nagpur MNC Recruitment: नागपूर महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार २५००० रुपये पगार; पात्रता आणि अटी जाणून घ्या

Nagpur Municiapal Corporation Recruitment: नागपूरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. नागपूरमध्ये शिक्षक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Nagpur MNC Recruitment
Nagpur MNC RecruitmentSaam Tv
Published On

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूरमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. नागपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. शिक्षक पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

नागपूर महानगरपालिकेत २६ जागांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी मुलाखतीची तारीख ३० सप्टेंबर आणि ०१ ऑक्टोबर २०२४ आहे.

Nagpur MNC Recruitment
ESIC Jobs : रेझ्युम आताच तयार करा, परीक्षाशिवाय सरकारी नोकरी, महिना ६७००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

नागपूर महानगरपालिकेत स्पोर्ट्स टीचर आणि संगीत शिक्षक पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा BP.Ed/MP.Ed किंवा B.A/ संगीत विषयात एम.ए पदवी प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला शिक्षण विभाग, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे उपस्थित राहायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २५,००० रुपये पगार मिळणार आहे.

Nagpur MNC Recruitment
Railway Jobs: रेल्वेत तब्बल ५००० पदांसाठी जम्बो भरती, पात्रता फक्त दहावी पास, पगार किती? अर्ज कसा कराल? जाणून घ्या A टू Z माहिती

रेल्वे भरती

सध्या रेल्वेमध्ये भरती सुरु आहे. रेल्वे एनटीपीसीमध्ये अंडरग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अंडरग्रॅज्युएटसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. रेल्वेत तब्बल ११५८८ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यातील ३००० पदे ही अंडरग्रॅज्युएट पदासाठी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करा.

Nagpur MNC Recruitment
Government Jobs: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी कामाची बातमी, NIACL कंपनीत ३२५ पदांसाठी भरती; जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com