मुंबई : नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावते. ही एक्स्प्रेस ट्रेन ५७५ किमी अंतर केवळ ७ तास आणि १५ मिनिटांत पार करते. या ट्रेनचा प्रवासाचा वेग सरासरी ७९ किमी/तास आहे. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर जंक्शन, सेवाग्राम जंक्शन, चंद्रपूर, बल्हारशाह, रामागुंडम, काझीपेठ जंक्शन आणि सिकंदराबाद जंक्शन या एकूण सात स्थानकांवर थांबते.
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसचं पीएम मोदींच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालंय. या ट्रेनमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांचा मोठा कायापालट झालाय. ही भारतातील ६५वी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) आहे. ती नागपूर, हैदराबाद, सिकंदराबाद या शहरांना जोडण्याचं काम करते. भारतीय रेल्वे कनेक्टिव्हिटीमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसकडे बघितले जाते.
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचा नागपूर जंक्शन येथून प्रवास (Nagpur Secunderabad Vande Bharat Express) सुरू होतो. नागपूर जंक्शनवरून ट्रेन पहाटे पाच वाजता सुटते. ट्रेनचा पहिला थांबा सेवाग्राम जंक्शन ५ वाजून ४३ मिनिटांनी आहे. पुढील थांबा चंद्रपूर येथे आहे. तेथे ट्रेन ७ वाजून ३ मिनिटांनी पोहोचते. त्यानंतर बलहारशाह येथे वंदे भारत एक्सप्रेस ५ मिनिटांसाठी थांबते. तेथे ट्रेन ७ वाजून २० मिनिटांनी पोहोचते.
वंदे भारत एक्सप्रेसचा पुढील थांबा रामागुंडम येथे ९ वाजून ८ मिनिटांनी (Indian Railway) आहे. त्यानंतर ट्रेन १० वाजून ०४ मिनिटांनी काझीपेट जंक्शन येथे पोहोचते. ट्रेन सिकंदराबाद जंक्शन येथे १२ वाजून १५ मिनिटांनी पोहोचते. हा ट्रेनचा अंतिम थांबा आहे. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एकूण आठ डबे आहेत. चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास अशा दोन (Nagpur Secunderabad Train) प्रकारच्या आसनांची सुविधा आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.