Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

Garba In Mumbai Local Train : ट्रेनमध्ये प्रवास करताना काही महिलांनी येथेच गरबा खेळण्यास सुरुवात केली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Garba In Mumbai Local Train
Garba In Mumbai LocalSaam TV
Published On

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत प्रत्येक महिला घर आणि नोकरी दोन्ही संभाळते. सध्या प्रत्येक घरात महिला घराची जबाबदारी सांभाळून नोकरी करत आहेत. मुंबईमध्ये विविध उपनगरांत अनेक महिला राहतात. या महिला ट्रेनने प्रवास करत आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचतात. दिवसातला बराच वेळ कामात आणि ट्रेनमध्ये प्रवास करण्यात जातो. ट्रेनमध्ये प्रवास करताना काही महिला आपल्या आवडीनिवडी जपत खेळ खेळतात आणि सणही साजरे करतात.

Garba In Mumbai Local Train
Navratri 2024: नवरात्रीच्या नऊ रंगाना आहे खास महत्व; कोणत्या दिवशी कोणता रंग जाणून घ्या

सध्या सर्वत्र नवरात्रीचा जल्लोष सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती देवीची मनोभावे सेवा करत देवीची पुजा करत आहे. नवरात्र म्हटलं की दांडिया आणि गरबा खेळ आलाच. गरबा खेळण्यासाठी काही महिलांना वेळ मिळत नाही. त्यामुळे महिला ट्रेनमध्येच ग्रुप करून गरबा खेळतात. गरबा खेळताना त्या स्वत:ची आणि अन्य प्रवाशांची देखील काळजी घेतात. सोशल मीडियावर सध्या याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर महिलांनी ट्रेनमध्ये गरबा खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुसऱ्या दिवशी महिलांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केलेत. हे कपडे परिधान करून महिला ट्रेनमध्ये नटूनथटून आल्या आहेत. ट्रेन सुरुहोताच दरबाजा आणि सिट यांमध्ये असलेल्या पॅसेजमध्ये महिला दरबा खेळत आहेत.

गरबा खेळताना महिलांच्या चेहऱ्यावर भरपूर आनंद दिसत आहे. त्यांनी ट्रेनमध्ये एक मोठा स्पिकर लावला आहे. या स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणी सुद्धा लावण्यात आली आहेत. एक गुजराती गाणं लावून महिलांनी यावर गरबा खेळला आहे. महिलांचा व्हिडिओ @chal_mumbai या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मस्तच छान एन्जॉय करतायत नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना, अशी कमेंट एका महिलेने केली आहे. भारी आदिशक्ती आहेत कुठे काय करतील सांगता येत नाही नवरात्री उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशीही कमेंट एकाने केली आहे. तर एका व्यक्तीने गरबा खेळताना कुणाला धक्का लागला तर भांडणं सुरू होतील असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Garba In Mumbai Local Train
Navratri Special Makeup Tricks: गरबा खेळताना मेकअप अजिबात उतरणार नाही करा या ट्रिक्स फॉलो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com