Manasvi Choudhary
नवरात्रीच्या दिवसांत भारतीय संस्कृतीमध्ये रंगाना फार महत्व आहे.
नवरात्रीच्या दिवसांत रंगाचा उत्सव साजरा केला जातो. त्याबरोबर नवरात्रीचे नऊ रंग एकात्मतेचे प्रतीक असतात.
नवरात्रीच्या दिवशी देवी मातेला सुध्दा ठरावीक रंगाचे वस्त्र नेसवले जाते. या दिवशी महिला व मुली रंगाचे कपडे परिधान करतात.
नवरात्रीमधील पिवळा रंग उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे. या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा पिवळ्या फुलांनी आणि पिवळे वस्त्रानीं परिधान करुन केली जाते.
नवरात्रीच्या दिवसातील हिरवा रंग वैवाहिक जीवनाशी संबंधित आहे. या दिवशी अविवाहित मुली देवी मातेची पूजा करुन योग्य वर मागत असतात.
नवरात्रीमधील राखाडी रंग देवीला खूप प्रिय आहे. सप्तमीच्या दिवशी राखाडी रंगाचे कपडे परिधान केले जातात.
नवरात्रीमधील शैलपुत्री देवीला नारंगी रंग आवडत असल्याने सर्व ठिकाणी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. शैलपुत्री देवी दुर्गा मातेचे पहिले रुप आहे.
नवरात्रीच्या पांढऱ्या दिवशी दुर्गामातेच्या ब्रह्मचारिणीचे रुप पुजले जाते. या देवीचा आवडता रंग पांढरा असल्याने हा रंग आयुष्यात संयम आणि हिंसा शिकवत असतो.
नवरात्रीमधील लाल रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. त्याचबरोबर चंद्रघंटा देवीचा हा प्रिय रंग पराक्रमासाठी प्रेरित आहे.
नवरात्रीमधील कुष्मांडा देवीला गडद निळा रंग खूप प्रिय आहे. म्हणून सातव्या दिवशी गडद निळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.
महागौरी देवीचा जांभळा रंग आवडता आहे. त्यामुळे जांभळा रंग शांती आणि समाधानाच्या प्रतीकेसाठी वापरला जातो.