Viral Video
Viral NewsSaam Tv

Viral News: ट्रॅफिक जाममध्येही तरुणीचा उत्साहच निराळा, ऑटोमधून उतरली अन् बेधुंद होऊन नाचली; पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतू तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहे.
Published on

''आनंद'' हा शब्द ऐकताच अनेक चिंतापासून व्यक्ती मोकळा होतो. सध्या बदलत्या जीवनपद्धतीमुळे प्रत्येक व्यक्ती आपल्याला कायम टेंशनमध्ये दिसून येतो. लहान गोष्टीमध्ये आनंद हा असतो, हे प्रत्येकजण विसरुन गेलेला आहे. मोठ्या गोष्टींत अडकून जवळ असलेला आनंदाच्या गोष्टी साजरा करणं व्यक्तीला नकोश्या वाटतात किंवा याच गोष्टी साजरा करण्यात अनेकजण संकोच बाळगतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तरुणीचे या गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी कौतुक केलेले आहे. नक्की काय घडले असेल ते तुम्ही या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ बेंगळुरमधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनधून समजते. शिवाय व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''बेंगळुरूमधील एका व्हायरल व्हिडिओमध्ये, एक मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत ऑटोरिक्षात बसते, ट्रॅफिक जॅमच्या वेळी रस्त्याच्या कडेला बँडवर नाचत असलेल्या एका उत्साही गटाने मोहित केले. तिचा कॅमेरा (Camera)मित्राकडे सोपवताना आणि उत्सुकतेने रस्ता ओलांडताना तिची उत्सुकता दिसून येते. ती सामील होते आणि उत्साहाने नाचते. तिच्या सभोवतालचे सर्वजण उत्स्फूर्त मजा घेत असलेले दृश्य एक आनंदी उत्सव आहे.''

नेमके काय घडते?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, तरुणी सुरुवातीस ऑटो रिक्षामध्ये बसलेली दिसतेय. व्हिडिओत पुढे दिसतेय की, रस्त्यावर सिग्नल लागला असल्याने ऑटो रिक्षा थांबलेला आहे. व्हिडिओ पुढे पाहले असता रस्त्याच्या एका बाजूला काही व्यक्ती बॅंडच्या तालावर डान्स करत असतात. अशातच ही तरुणी रिक्षामधून उतरते आणि त्यांच्या सोबत डान्स करण्यास सुरुवात करते. सर्व व्हिडिओ तरुणीच्या मैत्रिणीने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो इन्स्टाग्रामवरील ''@jist.news'' या अकाउंटवर साधारण १८ तासापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओला काही वेळातच तब्बल ९ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे तर अनेक कमेट्सही व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''सगळे लोक तिच्याकडे कसे वळले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''याला म्हणतात खरा आनंद '' तर बाकी यूजर्संनीही तरुणीचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Viral News: अरे बापरे! गरबा खेळताना तरुणाच्या अंगात अचानक लागले लाईट्स? व्हायरल VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com