Saam Tv
तुम्हाला गरबा खेळताना घाम येत असेल तेव्हा तुमचा मेकअप उतरत असेल. त्याने चेहरा काळपट दिसू शकतो.
नवरात्रीसाठी तुम्हाला परफेक्ट मेकअप करायचा असेल तर या सोप्या ट्रिक्स करा फॉलो.
तुम्ही गरब्याला जाणार असाल तर सर्वात आधी चेहऱ्याला फेसपॅक किंवा स्क्रब करुन घ्या.तुम्ही घरगुती फेसपॅकचा वापर सुद्धा करु शकता.
मेकअप करण्याआधी क्लिंजिंग महत्वाची आहे. तुम्ही कच्च्या दुधाचाही वापर करु शकता.
चेहरा थोडा ओलसर असताना मॉईश्चराय लावावे. त्याने चेहऱ्याला कसलीही हानी पोहोचत नाही आणि मेकअप सेट होतो.
तुम्ही स्किन टाइप नुसारच प्रायमर विकत घ्या. त्याने तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग येणार नाहीत. त्याने डार्क सर्कल्स लपवता येतात.
सगळा मेकअप सेट करण्यासाठी कन्सिलर आणि कॉम्पॅक्ट खुप महत्वाचे असते. मेकअप सेट झाल्यावर त्यावर तुम्ही साधी पावडर लावू शकता. त्याने तुमचा मेकअप जास्त काळ टिकून राहतो.
तुम्ही काजळ आणि लिपस्टीक निवडताना शक्यतो लॉंग लास्टींग प्रोडक्ट्स घ्यावे. ते दिर्घकाळ तुमच्या त्वचेवर टिकून राहतात.
तुम्ही लिपस्टीक ऐवजी लिप लायनर सुद्धा लावू शकता. त्याने एक उत्तम शेप तुमच्या ओठांना मिळू शकतो. तसेच लिपस्टीक पसरण्याची चिंता मिटेल.