ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूड म्हंटल की, सुंदरता आकर्षकता येतेच. बॉलिवुडच्या स्टार्स गरब्या निमित्त नेहमीच नविन आणि आकर्षक लूक करत असतात.
यंदाच्या नवरात्रीसाठी सुद्धा बॉलिवुडच्या तारकांनी अनोखे आणि पांरपारीक लुक केले आहेत. जे फॉलो करुन तुम्ही सगळ्यात आकर्षित दिसु शकता.
नवरात्रीच्या आउटफीटमध्ये प्रत्येक अभेनेत्रीने विविध आणि सगळ्यात हटके ब्लाउज परिधान केले आहेत.
तुम्ही या नवरात्रीला मल्टी कलर्सचे ब्लाउज परिधान करु शकता.लेहंगा चोळी साठी नविन डिजाइन तुम्ही फॉलो करु शकता.
तुमची उंची जर कमी असेल तर तुम्ही व्ही शेप चे स्लिव्हलेस ब्लाउज परिधान करु शकता.
तुमचे केस जर लांब असतील तर तुम्ही "डोरी ब्लाउज" वापरु शकता.
तुम्ही लेहंगासोबत डायमंड नेक ब्लाउज वापरु शकता. त्याच जोडीला तुम्ही ब्लॅक डायमंड असेलेले झुमके वापरू शकता.
तुम्हाला सगळ्यात आकर्षक दिसायचे असेल तर तुम्ही डीप व्ही नेक ब्लाउज सोबत दुप्पटा घेवू शकता. हा लूक पाहून सगळे तुमच्याकडेच पाहत राहतील.