Canada Viral Video: भयंकर वास्तव... चक्क वेटरच्या नोकरीसाठी हजारोंच्या रांगा, कॅनडामधील भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video: आपल्याला सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यामधील काही व्हिडिओ पाहण्यासारखे असतात. पण सध्या सोशल मिडियावर नोकरीच्या चिंतेबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
canda
candainstagram
Published On

प्रत्येकाच्या आयुष्यात सोशल मिडियाला खूप महत्व आहे. सोशल मिडियवर अनेक व्हिडिओ व्हायरल बोत असतात. कधी स्टंट तर कधी डान्स पण सध्या एक नोकरीबाबत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर लाखो नागरिक शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जात असतात. परदेशात जाऊन शिकणे आणि तिथेच नोकरी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सध्या सर्व नागरिकांचे उच्च शिक्षण असून ही त्यांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आयुष्यात रोजगाराची समस्या तयार होते. यामुळे काही नागरिक परदेशात जाण्याचे ठरवतात. पण सध्या परदेशात सुद्धा नोकरी बाबत चिंता निर्माण झाली आहे. असाच एक कॅनडामधील नोकरीच्या बाबतीतला व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला आहे.

कॅनडामधील व्हायरल व्हिडिओ

सोशल मिडियावर व्हायरल झालेलो व्हिडिओ कॅनडामधील आहे. या व्हिडिओमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी नोकरीसाठी रांगेत उभे राहताना दिसत आहे. कॅनडामधील ही नोकरी वेटरच्या पदासाठी आहे. विद्यार्थ्यांनी ही रांग मुलाखतीसाठी लावली आहे. पण इतका वेळ रांगेत उभे राहून सुद्धा त्यांची मुलाखत घेण्यात आली नाही. म्हणून त्यांनी या गोष्टीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे लोकांमध्ये शिक्षणाबाबतीत आणि नोकरीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

कॅनडामधील व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्यांने आपले मत सांगितले आहे. आगमवीर सिंग हा विद्यार्था खूप तास रांगेत उभा होता. आगमवीर मुलाखतीसाठी सुमारे दुपारी बारा वाजता आला होता. पण तेव्हा सुद्धा लाईन खूप मोठी असल्याचे त्याने सांगितले आहे. आगमवीरने इंटरनेटवर मुलाखतीचा फॅार्म भरला होता; पण मुलाखत घेण्यात आली नाही. याबद्दल त्याला खूप वाईट वाटले आहे. या व्हिडिओमुळे नागरिकांच्या मनात नोकरी बाबत खूप प्रश्न तयार झाले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की नोकरीच्या संधी खूप कमी असतात. त्यामुळे नागरिकांची नोकरीसाठी नेहमी धावपळ सुरु असते.

सोशल मिडिया फ्लॅटफॅार्मवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नागरिकांना @MeghaUpdates अंकाउटवर पाहायला मिळणार आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला 22k लाईक आणि 673 कमेंट्स आल्या आहेत. नागरिकांनी या व्हिडिओला खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिले आहे की, 'इतक्या भीषण परिस्थितीत इतके विद्यार्थी पाहणे निराशाजनक आहे'. तर दुसऱ्या यूजर्जने 'अनेक आशावादी लोक काम शोधण्यासाठी धडपडत आहेत हे पाहून हृदयद्रावक आहे'.

canda
Viral Video: ट्रॅफिकमध्ये कार अडकली, खासदार सुप्रिया सुळेंनी केली बाईकवारी; VIDEO होतोय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com