

अहमदाबादवरून मुंबईला येणाऱ्या वंदे भारतमध्ये जेवणात झुरळं सापडल्याची घटना घडली आहे. या प्रकार पाहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे भारतीय रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या खाण्यावर प्रश्न उपस्थित केलं जातंय. हे प्रकरण समोर आल्यानंतर IRCTC ने कारवाई करत कंपनीला १० लाखांचा दंड ठोठावला असून संबंधित कॉन्ट्रॅक संपण्यासाठी नोटीसही पाठवलीये.
प्रवास करतेवेळी नागरिकांना जेवताना अन्नामध्ये झुरळं सापडल्यावर तक्रार केली. यावेळी लोकांनी जेवणाचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. ज्यामुळे ही घटना व्हायरल होऊन समोर आली. आदित्य डिडवानिया नावाच्या युजरच्या जेवणार ही झुरळं सापडल्याने त्याने हा मुद्दा उपस्थित केला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही घटना केवळ एका व्यक्तीसोबत घडली नाही. तर कोचमध्ये आणखी एका व्यक्तीच्या जेवणात झुरळं सापडली. सतत तक्रारी आल्यामुळे कोचमधील बाकी प्रवाशांनी जेवण केलं नाही.
या प्रकरणाचं गांभीर्य ओखळून IRCTC ते तातडीने याची चौकशी केली. हे खाणं M/S ब्रंदावन फूड प्रोडक्ट्स (RK ग्रुप) द्वारे पुरवण्यात आलं होतं. प्राथमिक तपासणी केल्यानंतर कंपनीवर १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय त्याचं कॉन्ट्रॅक संपण्याची प्रक्रिया सुरु कऱण्यात आली आहे.
IRCTC च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर लगेचच संबंधित डब्यात चांगली स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोल करण्या आलं. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, प्रवाशांची सुरक्षितता, स्वच्छता आणि क्वालिटी ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि असा निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.