Viral Video: 20 वर्षीय तरूणीचा कारनामा; गर्दीचा फायदा घेत कांदिवली स्टेशनवर चोरलं २ लाखांचं मंगळसूत्र

Kandivali railway station theft: रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणांचा फायदा घेत चोरी करणाऱ्या टोळ्या आता सक्रिय झाल्या आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, कांदिवली रेल्वे स्टेशन परिसरात एका २० वर्षीय तरुणीने एका महिलेच्या गळ्यातील तब्बल २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबवले.
Kandivali railway station theft
Kandivali railway station theftsaam tv
Published On

मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशन परिसरात भरदिवसा घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गर्दीचा फायदा घेत एका २० वर्षीय तरुणीने महिलेच्या गळ्यातील सुमारे २ लाख रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र चोरल्याची ही घटना घडलीये. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे या महिला आरोपीला स्टेशनवरच पकडण्यात यश आलंय.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, रेल्वे स्टेशन परिसरातील नेहमीची गर्दी दिसतेय. अशावेळी अचानक एक महिला आरडाओरडा करताना दिसते. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचं लक्षात येताच तिला संशय आला. यावेळी काही प्रवाशांनी आणि स्थानिकांनी संशयित तरुणीचा पाठलाग करून तिला पकडलं आणि तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Kandivali railway station theft
Angry Bull Attack: १,२ नव्हे ३ वेळा, रस्त्यावरच ट्रॅक्टरला जोरात बैलाने धडक दिली, ट्रक्टरचा चेंदामेंदा झाला, थरारक व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने गर्दीचा फायदा घेत ही चोरी केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे, ही घटना भरदिवसा घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्याचीही चर्चा सुरू झालीये.

आरोपी तरूणी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून अधिक चौकशी केली जातेय. या प्रकरणात ती एकटी होती की एखाद्या टोळीचा भाग आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

Kandivali railway station theft
Viral trending news: एक खिडकी उघडी ठेऊन केली मोठी चूक; तीन वर्षांनी घरी परतला आणि पाहिलं तर...

प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन

दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येतंय. गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने घालताना खबरदारी घेणं आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Kandivali railway station theft
Viral Video: चाट खाताय तर सावध व्हा; चप्पल घालून बटाटे तुडवतानाचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com