Viral Video: चाट खाताय तर सावध व्हा; चप्पल घालून बटाटे तुडवतानाचा व्हिडिओ व्हायरल

Potato Cleaning Video: गाझियाबादमधील चाट दुकानाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक व्यक्ती बटाटे पायाने स्वच्छ करताना दिसतो. या घटनेमुळे अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Potato Cleaning Video
Potato Cleaning Videosaam tv
Published On

गाझियाबादच्या लोनी परिसरातील एका चाट कॉर्नरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या 41 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चप्पल घालून मोठ्या भांड्यात ठेवलेल्या बटाट्यांना पायाने तुडवत स्वच्छ करताना दिसतोय. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक संतापले असून पुन्हा एकदा अन्नाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जातायत.

उत्तर प्रदेशातील व्हिडीओ झाला व्हायरल

हा व्हिडिओ डीएलएफ अंकुर विहार-3 मधील एटीएम चौकाजवळ असलेल्या ‘कृष्णा चाट भंडार’चा असल्याचं सांगितलं जातंय. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळेस दुकानाबाहेर अॅल्युमिनियमच्या एका भांड्यात बटाटे ठेवलेले दिसतात. यावेळी एक व्यक्ती चप्पल घालून त्या बटाट्यांवर पाय देत त्यांना धुताना दिसतो. काही बटाटे भांड्याबाहेर पडतानाही स्पष्ट दिसत आहेत.

Potato Cleaning Video
Viral wedding video: नवऱ्याचा हटके स्टाइल पाहून लोक थक्क, लाईट्सच्या ड्रेसमुळे व्हिडिओ झाला व्हायरल

हा प्रकार एका ग्राहकाने मोबाईलमध्ये शूट केला आहे. व्हिडिओमध्ये एक महिलेचा आवाज ऐकू येतो. हा व्हिडीओ शूट करताना ती म्हणते की, 'माझी आईसुद्धा इथली टिक्की खाते, आता मी तिला ही खरी परिस्थिती दाखवणार आहे.' या घटनेबाबत लोकांमध्ये अधिकच नाराजी निर्माण झालीये.

या ठिकाणी दररोज अनेक लोकं चाट आणि आलू टिक्की खाण्यासाठी येतात. त्यामुळे अशा प्रकारे बटाट्यांची हाताळणी होत असल्याचं उघड झाल्याने ग्राहकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त कऱण्यात येतेय. काही लोकांनी दावा केला आहे की, रात्रीच्या वेळी बटाटे अशाच पद्धतीने नियमितपणे स्वच्छ केले जातात.

Potato Cleaning Video
Viral Video: सिन्नर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा मुक्तसंचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,पाहा VIDEO

या घटनेनंतर एका व्यक्तीने अंकुर विहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दुकानाच्या मालकासह व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली आहे

Potato Cleaning Video
Viral Video: सिन्नर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा मुक्तसंचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,पाहा VIDEO

यापूर्वीही अस्वच्छतेचे व्हिडीओ समोर

यापूर्वीही अन्नपदार्थांमध्ये अस्वच्छतेचे काही व्हिडिओ समोर आले होते. असे किळसवाळे प्रकार पाहून बाहेरील अन्न खावं की नाही असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com