आर्थिक संकट कोसळणार, पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडणार? 'बाबा वांगा' यांच्या भविष्यवाणीने जगात खळबळ

baba vanga predictions : जगात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान. 'बाबा वांगा' यांची भविष्यवाणी चर्चेत आली आहे.
 Baba Vanga Predictions
Viral posts about Baba Vanga saam tv
Published On
Summary

बाबा वांगा यांची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत

प्रसिद्ध अंध भविष्यवेत्त्या बाबा वांगा यांची भविष्यवाणी सर्वत्र व्हायरल

जगात आर्थिक संकट कोसळणार असल्याचाही भविष्यवाणीत दावा

जगभरातील देशात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या किमती भडकल्या आहेत. इंधनाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या असताना बल्गेरियातील प्रसिद्ध अंध भविष्यवेत्त्या बाबा वांगा यांच्या कथित भविष्यवाणीची जोरदार चर्चा रंगली आहे. बाबा वांगा यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कथित भविष्यवाणी ही महायुद्ध, आर्थिक-इंधन संकटावर केल्याचा दावा सोशल मीडियावर युजर्सकडून केला जात आहे.

 Baba Vanga Predictions
CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

पश्चिम आशियात अमेरिका-इराणमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यानंतर पेट्रोल-डिझेल-एलपीजी सारख्या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. काही लोक ही महागाई बाबा वांगा यांच्या कथित भविष्यवाणीशी जोडत आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, बाबा वांगा यांनी भविष्यवाणी केली होती की, २०२६ हे वर्ष जागतिक संघर्ष आणि आर्थिक संकटाचे असेल, यात इंधनाचा तुटवडा आणि दरवाढीचा समावेश असेल'.

बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीत पेट्रोल,डिझेल किंना एलपीजीच्या किंमतीचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. ही भविष्यवाणी इराण-इस्त्रायल वादाशी जोडून व्हायरल केली जात आहे. ही कथित भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

 Baba Vanga Predictions
Political News: भाजपचं सरकार येताच ममता बॅनर्जींना मोठा झटका, TMC च्या ३१ बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

सर्वसामान्यांमध्ये या भविष्यवाणीविषयी जोरदार चर्चा होत आहे. काही जण म्हणत आहे की, 'बाबा वांगा यांची कथित भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहेत'. देशातील विविध जिल्ह्यात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. या दरवाढ, महागाईमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांना खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. तर सरकारनेही सोने खरेदीवर निर्बंध लावले आहेत. आता २०२६ हे संपूर्ण वर्ष कसं जाईल, हे येणारा काळच सांगेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com