CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

LPG cylinder price hike : सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरही महागण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून भाज्यांचे दरही वाढले आहेत.
LPG Cylinder
LPG cylinder saam tv
Published On

LPG Cylinder Price Update : भारतामध्ये पुन्हा एकदा महागाईचा भडका उडला आहे. मे महिन्याच्या सुरूवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर तब्बल एक हजार रूपयांनी वाढले. त्यानंतर मग सोनं, दूध, सीएनजी आणि आता पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रति लिटर ३ रूपयांनी वाढ केली. सीएनजी, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर प्रवास महाग होईल, पण दुसरीकडे किचनमधील बजेटही बिघडण्याची शक्यता आहे. कारण पुढील काही दिवसांत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आजपासून काय महागले?

शुक्रवार सकाळीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाले. तेल कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जारी केले. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांची किंमत 3 रुपये प्रति लीटरने वाढवण्यात आली. तर गुरूवारी सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो २ रूपयांची वाढ करण्यात आली होती. त्याशिवाय दूधाचे दरही प्रति लिटर २ रूपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अचानक झालेल्या दर वाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

भाज्या महागल्या

वाढत्या इंधन दरवाढीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) भाज्यांच्या दरात पाच ते दहा रुपयांची मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने कोथिंबीर, टोमॅटो आणि शिमला मिरची यांसारख्या भाज्यांचे भाव कडाडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. आखाती देशांतील अस्थिरतेमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी, देशांतर्गत इंधन दरवाढ झाल्याने वाहतूकदारांनीही भाड्यात वाढ केली आहे. मालवाहतूक महागल्यामुळे बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याचे दर वाढले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

LPG Cylinder
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

पेट्रोल-डिझेलनंतर आता घरगुती गॅस महागणार?

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती वाढल्यानंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) दरातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. मार्च महिन्यात गॅसच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली होती, त्यानंतर किंमती स्थिर होत्या. मात्र, आता पुन्हा दरवाढीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. भारत आपल्या गरजेच्या ५५ टक्क्यांहून अधिक एलपीजी परदेशातून आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०५ ते १२० डॉलरवर पोहोचले आहेत. यामुळे गॅसची निर्मिती आणि आयात दोन्ही महाग झाले आहे. वाढत्या खर्चामुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण येत आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी कंपन्या लवकरच सिलिंडरचे दर वाढवून त्याचा बोजा सर्वसामान्यांवर टाकण्याची शक्यता वर्तवली आहे.

LPG Cylinder
Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

मंत्री फिरतात तिकडे, आम्ही भरतो पेट्रोल आता सायकल काढण्याची आली वेळ, पुणेकरांच्या प्रतिक्रिया

पंतप्रधान काय मुख्यमंत्री काय ते फिरतायत मजा करत आम्ही भरतोय इकडे पेट्रोल, त्यांच्या गाड्यांच्या किंमती तरी बघितल्या का? पेट्रोल वाढलं तर आता सायकल वापरतो असे मत पुणेकरांनी व्यक्त केलय. पुण्यासह देशात आज इंथन दर वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या मनात रोष आहे.

पेट्रोल वाढलं मग पगार पण वाढवा

दैनंदिन जीवनातील गरजांच्या गोष्टींच्या किमती वाढतात. बॉसचे कितीही कामं करा पण पगार काही वाढत नाही. सुट्टी घेतल्यावर काम कोण करणार? असं विचारतात पण इकडे पेट्रोल वाढतंय, आता सांगा ऑफिसला कसं जायचं? अशी बोलकी प्रतिक्रिया एका पुणेकराने आज पेट्रोल दर वाढीवर दिली आहे. दैनंदिन गरजांच्या गोष्टींसाठी पैशे वाढवणार असाल तर पगार वाढला पाहिजे ना किंमती वाढल्या पगार तेवढाच आहे असं ते म्हणाले. आज देशभरात पेट्रोल डिझेल चे भाव वाढल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येतायत.

LPG Cylinder
Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com