Dilip Dhotre accident News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि मनसेचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai pune Expressway) धोत्रे यांच्या कारच भीषण अपघात झाला आहे. या अपघातात धोत्रे यांच्या फॉर्च्युनर गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
या भीषण अपघातात दिलीप धोत्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दिलीप धोत्रे यांच्या कारचा अपघात नेमका कसा झाला? याबाबत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की फॉर्च्युनर गाडीचा चक्काचूर झाल्याचे दिसतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप धोत्रे हे मुंबईतील कामकाज आटोपून आपल्या फॉर्च्युनर गाडीने पुण्याच्या दिशेने परतत होते. यावेळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या गाडीला रात्री भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, फॉर्च्युनर गाडीचा पुढच्या बाजूने पूर्णतः चक्काचूर झाला आहे.
अपघातानंतर तातडीने मदतकार्य राबवून धोत्रे आणि त्यांच्या चालकाला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज ठाकरे यांच्या जवळच्या नेत्याचा अपघात झाल्याचे समजताच मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. राज ठाकरे यांनीही या घटनेची दखल घेतली असून, ते धोत्रे यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेत असल्याचे समजते. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.