Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Petrol Diesel Price Today : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील नवे इंधन दर जाणून घ्या.
Latest Petrol Diesel News
Petrol Diesel Price Todaygoogle
Published On

Petrol, diesel prices hiked: मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास एक हजार रूपयांची वाढ झाली होती. तर दोन दिवसांपूर्वीच सीएनजीचे दरही वाढवण्यात आले होते. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकसह देशभरात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ होऊन १०६.६८ रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची वाढ होऊन ९३.१४ रुपये प्रति लिटर झाले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ३ रुपयांची वाढ झाली आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचे दर 107.93 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 94.41 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे. पुणे, परभणी, ठाणे, सोलापूर, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर नागपूरमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

Latest Petrol Diesel News
CNG Price Hike : प्रवास महागणार! CNG च्या किंमती अचानक वाढल्या, वाचा नवे दर काय?

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर आता ९४.७७ रुपयांवरून ९७.७७ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचे दर ८७.६७ रुपयांवरून ९०.६७ रुपये प्रति लिटर झाले आहेत. या दरवाढीमुळे अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या वर गेले आहेत. कोलकातामध्ये ३.२९ रुपयांच्या दरवाढीनंतर पेट्रोल आता १०८.७४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल ३.११ रुपयांनी वाढून ९५.१३ रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्येही मोठी दरवाढ झाली असून पेट्रोलचे दर २.८३ रुपयांनी वाढून १०३.६७ रुपये प्रति लिटर झाले आहेत आणि डिझेलचे दर २.८६ रुपयांनी वाढून ९५.२५ रुपये प्रति लिटर झाले आहे.

Latest Petrol Diesel News
Pune : आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या; एकट्याला गाठून धारदार शस्त्राने केले वार

अमेरिका-इराण संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संकटामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात अडथळा आला आहे. जागतिक संकट असतानाही देशात इंधनाची कमतरता नाही. पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचे रेशनिंग लागू करण्याची कोणतीही योजना नसल्याचे केंद्राने सांगितले होते. घाबरण्याची गरज नाही. पुरेसा पुरवठा आहे. रेशनिंग लागू होणार नाही, असे तेल सचिव नीरज मित्तल यांनी अलीकडेच सांगितले होते. दरम्यान, जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता कायम असूनही, भारताकडे सध्या सुमारे ६० दिवसांचा इंधनाचा साठा आणि जवळपास ४५ दिवसांचा एलपीजीचा साठा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Latest Petrol Diesel News
Gold Rate Today : सोन्याचे दर आज वाढले की घसरले? वाचा २२, २४ कॅरेटचे प्रति तोळा दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com