

Viral News: भारतातील लोकं खाण्याचे खूपच शौकिन आहेत. वेगवेगळ्या स्टाइलने तयार केलेले आणि चविष्ट पदार्थ खायला अनेकांना आवडते. भारतात तर आजकाल खाण्यापिण्याच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग केले जातात. पण आता त्याचा जरा जास्तच अतिरेक होताना पाहायला मिळत आहे. एखाद्या पदार्थामध्ये काही तरी मसाले अथवा इतर पदार्थ मिक्स करुन त्यापासून वेगळाच पदार्थ तयार केला जातो आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याला वेगळंच नाव दिलं जातं.
आतापर्यंत तुम्ही मॅगी, पाणीपुरी, वडापाव,सँडविच, चहा यामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात आले असल्याचे तुम्ही पाहिले आहे. आता अशाच प्रकारचा प्रयोग चहाच्या बाबतीत ही करण्यात आला आहे. सोशल मीडियावर (Social Media) सध्या आयएएस चहावाल्याचा (IAS Chaiwala) व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. या चहावाल्याने चक्क चहामध्ये केळी आणि चिकू टाकला आहे. हा चहा पाहून तुम्हालाही पिण्याची इच्छा होणार नाही. आयएएस चहावाल्याचा हा स्पेशल चहा पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
स्ट्रीट फूड स्टॉल्सच्या दुकानदाराने फ्रूट टी तयार करण्याचा विचार केला आणि मग काय त्याने चहामध्ये केळी आणि चिकू टाकून विकायला सुरुवात केली. चहा तयार करण्याची त्याची पद्धत पाहून तुम्हाला सुद्धा तो पिण्याची इच्छा होणार नाही. या चहावाल्याने फ्रुट टी असे या स्पेशल चहाचे नाव दिले आहे. पण हा स्पेशल चहाचा व्हिडिओ पाहून नेटिझन्स मात्र नाराज झाले आहेत. फ्रुट टी हा भारतातील सर्वात महाग चहा असल्याचे हा चहावाला सांगत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा चहावाला चहा तयार करताना सांगतो की, मी 'फ्रूट टी' तयार करत आहे. हा चहा जगात आणि देशात कुठेच तयार करण्यात आला नाही. हा भारतातील सर्वात महाग चहा आहे. आतापर्यंत तुम्ही असा चहा कधीच प्यायला नसेल. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा चहा तयार करताना तो दूध आणि चहा पावडर आणि साखर टाकतो. त्यानंतर चहामध्ये चिकू आणि केळी टाकतो. त्यानंतर दोन्ही व्यवस्थित चहामध्ये मिक्स करतो.
त्यानंतर तो हा चहा तयार करुन ग्राहकांना प्यायला देतो. तो या'फ्रुट टी'साठी २०० रुपये घेतो. एक व्यक्ती त्याच्याकडून हा चहा घेतो आणि २०० रुपये देतो. त्यानंतर ही व्यक्ती सांगते की, मी पहिल्यांदाच ऐवढा महाग २०० रुपयांचा चहा पित आहे. गमतीची गोष्ट म्हणजे लोक त्याच्याकडून हा विचित्र चहा विकत घेतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे. ट्विटर युजर @HasnaZarooriHai ने व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.