Osmanabad ST Bus Accident: मोबाइलवर बोलणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात एसटी बस उलटली, 40 ते 50 प्रवासी जखमी

Osmanabad Police: बार्शीवरून भुमच्या दिशेने जाणारी ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये उलटली.
Osmanabad ST Bus Accident
Osmanabad ST Bus AccidentSaam Tv
Published On

Osmanabad News: उस्मानाबादमध्ये (Osmanabad) एसटी बसला अपघात (ST Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये 40 ते 50 प्रवासी जखमी झाले आहेत. परंडा तालुक्यातील भांडगावमध्ये ही घटना घडली आहे. जखमी प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून (Osmanabad Police) सुरु आहे.

Osmanabad ST Bus Accident
KCR In Solapur : के चंद्रशेखर राव महाराष्ट्र दौऱ्यावर, तेलंगणात BRS पक्षाला खिंडार; पक्षातील बड्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, भुम आगाराची एसटी बस क्रमांक MH20 BL 2805 ला अपघात झाला आहे. बार्शीवरून भुमच्या दिशेने जाणारी ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये उलटली. परंडा तालुक्यातील भांडगाव येथे ही घटना घडली. या अपघातामध्ये बसमधून प्रवास करणारे 40 ते 50 प्रवासी जखमी झालेत. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही.

Osmanabad ST Bus Accident
Praveen Darekar News : प्रवीण दरेकर आदित्य ठाकरेंवर बरसले; शेंबड्या पोरानं मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं (पाहा व्हिडिओ)

अपघाताची माहिती मिळताच, भांडगाव येथील स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या प्रवाशांना बसच्या बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे भुम ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मोबाइलवर बोलत बाइक चालवणाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या खाली उतरली आणि शेतामध्ये उलटल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Osmanabad ST Bus Accident
Bigg Boss OTT 2 Update : जिया शंकरने घेतला नॉमिनेशनचा धसका! हुंदके देताना पाहून नेटकरी बिथरले

दरम्यान, रविवारी रत्नागिरीमध्ये ट्रक आणि खासगी वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर पाच जण जखमी झाले होते. रत्नागिरीच्या दपोलीतील आसूद जोशी आळी येथे ही घटना घडली होती. या अपघातातील मृतांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींच्या उपचारासाठी लागणारा खर्च देखील सरकार करणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com