Prakash Ambedkar's statement About Chhatrapati Sambhajiraje: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या हत्येबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या हत्येत हिंदू देखील सभागी होते आणि त्यांना मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा दिली गेली असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
औरंगजेबाने त्याच्या भावाचीही हत्या केली, पण त्यात क्रुरता नव्हती. शिवाजी महाराजांच्या बाबतीतही क्रुरता दिसली नाही. पण संभाजी महाराजांसोबत केलेली क्रुरता आपल्या डोळ्यासमोर आहे, इतिहास आपल्यासमोर आहे. औरंगजेबाला ही क्रुरता कोणी करायला लावली, का करायला लावली हा संशोधनाचा विषय आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
या देशात औरंगजेबाने 54 वर्षे राज्य केलं हा इतिहास तुम्ही नाकारू शकत नाही. तो सुफी म्हणूनच गेला हे देखील नाकारता येत नाही. या सुफीझममुळेच उग्रवादी उठाव भारतात दिसत नाही. त्याने अनेक चांगल्या गोष्टी केल्या हे आपण नाकारू शकत नाही असे देखील प्रकास आंबेडकर म्हणाले.
'संभाजीराजे संगमेश्वरला का गेले यावर वाद'
प्रकार आंबेडकर म्हणाले, संभाजीराजे संगमेश्वरला का गेले यावर वाद आहे. त्यांची माहिती औरंगजेबपर्यंत कशी पोचली, जयचंदमुळे असा इतिहास आहे. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोचवली. औरंगजेबने संभाजी महाराजांना जो दंड दिला त्याची आम्ही निंदा करतो. संभाजीराजेंची हत्या मुस्लिम धर्माशी सहमत नाही, त्यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली. आपण औरंगजेबचा जितका निषेध करतो तितका, शिर्के, आबा भटजी यांचाही निषेध करायला हवा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
"समुहा समुहाला भिडवणं थांबवलं पाहिजे"
प्रकाश आंबेडकर म्हणाले, हिंदू मुस्लिम, जैन हिंदू हा वाद जो देशात होतोय त्याबाबत जो इतिहास दिला जातो तो बरोबर नाही. एका समूहाला दुसऱ्या समूहाशी भिडवण्याचा पर्याय थांबला पाहिजे. (Marathi Tajya Batmya)
"माझ्या निर्णयामुळे दंगल थांबली"
औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहिली, त्याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, मी कबरीवर फुल चढवली, अनेकजण कबरीवर गेले आहेत. माझ्या निर्णयामुळे जी दंगल झाली असती ती थांबली. मी दंगल थांबवली हे माझ्या कबरीवर जाण्याचं फलित आहे. राज्यात शांतता करण्यात माझा वाटा आहे, असं उद्धव ठाकरे यांना वाटतं. माझ्या भूमिकेमुळे दूध का दूध, पाणी का पाणी झालं असे देखील आंबेडकर म्हणाले. (Latest Political News)
"बीआरएस हा तिसरा पर्याय"
बीआरएसवर बोलताना आंबेडकर म्हणाले, BRS त्यांच्या राज्यात भाजपविरोधात लढतात, त्यामुळे ते भाजपची बी टीम आहे असे लेबलिंग लावणं थांबवलं पाहिजे. बीआरएस तिसरा पर्याय उभा राहिला आहे. विरोधक जर एकत्र येत असतील तर त्यांनी असे लेबलिंग लावण्याऐवजी शत्रुचा शत्रु आपला मित्र ही भूमिका स्विकारली पाहिजे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.