स्वस्त केक खाल, कॅन्सरनं जाल? आवडीनं केक खाणं पडेल महागात? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Eating Cake Will Cause Cancer : तुम्ही खात असलेला केक कसे बनवतात हे आपल्याला माहिती नसतं. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही केक खाणं सोडून द्याल. कारण, पैसे कमावण्याच्या नादात अनेक जण तुमचं आरोग्य धोक्यात घालत आहेत.
Eating cheap cake can cause cancer
Eating cheap cake can cause cancerSaamTV
Published On

मुंबई : तुम्ही केक खात असाल तर वेळीच सावध व्हा...कारण, तुम्ही खात असलेल्या केकमुळे आजारी पडू शकता. इतकंच नव्हे तर कॅन्सरसारखा गंभीर आजारही होऊ शकतो. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी तुम्हीच पाहा हा रिपोर्ट. तुम्ही केक खाताय तर सावध व्हा...कारण, असे केक खात असाल तर आजारी पडू शकता. इतकंच नव्हे तर कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो, असा दावा करण्यात आलाय.

तुम्ही खात असलेला केक कसे बनवतात हे आपल्याला माहिती नसतं. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही केक खाणं सोडून द्याल. कारण, पैसे कमावण्याच्या नादात अनेक जण तुमचं आरोग्य धोक्यात घालत आहेत. या व्हिडिओत बघा, कशा प्रकारे हे केक बनवत आहेत. कसलीही स्वच्छता नाही. त्यात रंग वापरले जातायत. त्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नव्हे तर कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. हा आरोग्याचा प्रश्न आहे. कारण, केक सगळेच आवडीने खातात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमने याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

Eating cheap cake can cause cancer
Pune News: अतिवृष्टीमुळे नव्हे तर 'त्या' बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पुण्यात पूर, माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड, प्रकरण काय?

आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

सगळेच केक आरोग्यासाठी हानिकारक नसतात

काहीजण केकसाठी हलक्या दर्जाचं साहित्य वापरतात

केकमध्ये मैदा, बेकिंग पावडर, तेलाचा वापर करतात

घातक रंगही केकमध्ये सर्रास वापरलेले जातात

स्वस्तातले केक खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो

Eating cheap cake can cause cancer
सिडकोच्या प्रकल्पात 900 कोटींची फसवणूक? एकनाथ शिंदेंच्या प्रकल्पाची चौकशी सुरू, मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com