
जालन्यातील खरपुडीतल्या सिडको प्रकल्पावरून शिवेसना-भाजपात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. 900 कोटींच्या प्रकल्पात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केलीय. त्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहलंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
ठाकरे गटाच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. आता सांबरे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हा शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.
शिंदेंच्या प्रकल्पाची चौकशी
- आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसलेला प्रकल्प राबवला
- शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरानं जमीन खरेदी
- भूमाफिया, दलाल, उद्योजकांच्या फायद्यासाठी प्रकल्प राबवला
- 900 कोटींचा भूसंपादनाचा खर्च सिडकोच्या माथी मारला
- एसआयटी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
राज्यात बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेत आलं. असं असलं तरी महायुतीत अंतर्गत कुरबुरी सूरूच आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलय. तर भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलंय. आधी एकनाथ शिंदेंच्या मुंबईतल्या 1400 कोटींच्या प्रकल्पाला ब्रेक लागला त्यानंतर जालन्यातील सिडको प्रकरणाची चौकशी...त्यामुळे शिवसेना आणि भाजपातलं हे कोल्डवॉर आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.