Pune News: अतिवृष्टीमुळे नव्हे तर 'त्या' बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पुण्यात पूर, माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड, प्रकरण काय?

Pune flood and questions raised: "त्या" अधिकाऱ्यांना बडतर्फ करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन बहुजन आघाडीचे अध्यक्ष किशोर कांबळे यांची मागणी
pune flood news
pune flood news Saam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: खडकवासला धरणातून २५ जुलै २०२४ पाणी सोडल्यानंतर नदीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले होते. तसेच पुलाची वाडी या परिसरामध्ये तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अनैसर्गिक पुराला आणि तरुणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे आणि जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांना सेवेतून बडतर्फ करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन बहुजन आघाडीचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी केली आहे.

नदीपात्रात सोडलेला पाणी विसर्ग व संबधित कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितलेला खडकवासला धरणातून पाणी विसर्ग यामध्ये खूप मोठया प्रमाणावर तफावत आहे. कुऱ्हाडे यांनी त्यावेळी खडकवासला धरणातून ३५००० क्युसेक पाणी सोडल्याची माहिती प्रशासन आणि प्रसारमाध्यमांना दिली होती. वास्तविक पाहता त्यांनी ६१,१७८ क्युसेक पाणी सोडले गेले होते हे आता माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून सिद्ध होत आहे.

pune flood news
Pune Crime : हातभट्टीची दारु विकण्यासाठी निघाला, पोलिसांनी सापळा रचत वाटेत धरलं, कारचा दरवाचा उघडताच...

खोटी आकडेवारी, दिशाभूल आणि पुणेकरांचा विश्वासघात

किशोर कांबळे म्हणाले की, खडकवासला धरणांच्या सांडव्यातून चुकीच्या पध्दतीने पाणी सोडल्यांमुळे तसेच पाणी सोडलेली खोटी आकडेवारी देवून शासनाची व पुणेकरांची दिशाभूल संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. वास्तविक वेळ (R.T.D.A.S) प्रणालीतील विसर्ग माहिती व प्रत्यक्ष धरण क्षेत्रातील व विभागीय कार्यालयातील खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पूर विसर्गची खोटी माहिती प्रसारित करून सर्वांची दिशाभूल केली. यासाठी अनेक कारणे देण्यात येत होती.

pune flood news
Kalyan Crime News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला वाचवा, भाजप कार्यकर्त्याची हाक

या परिस्थितीला नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा तसेच नदीसुधार प्रकल्पाचे काम जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच अनेक नवनवीन कारणे पुढे आणली जात होती. मात्र माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार या पुरास हे दोन्ही अधिकारीच जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यांच्या गलथान कारभारामुळे तीन होतकरू युवकांचा जीव गेला. हजारो नागरिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री, पालकमंत्री, जलसंपदामंत्र्यांकडे आणि पोलीस आयुक्तांकडे केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com