Pune Crime : हातभट्टीची दारु विकण्यासाठी निघाला, पोलिसांनी सापळा रचत वाटेत धरलं, कारचा दरवाचा उघडताच...

Pune Crime News : पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बारा फाटा परिसरात सापळा रचला.
 police seizes hand made liquor
police seizes hand made liquor SaamTV
Published On

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी निघालेल्या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांना २ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आलं आहे. मुबारक जाफर गड्डे (वय ४३, पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता.हवेली) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बारा फाटा परिसरात सापळा रचला. तेव्हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी एक चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार पकडली. त्या गाडीमध्ये हातभट्टी गावठी दारु भरलेली एकूण ८ कॅन आढळून आले. त्यात एकूण २८० लीटर दारु मिळून आली आहे.

 police seizes hand made liquor
Dhule Crime News : मद्य वाहतुक प्रकरणी धुळे एलसीबीकडून तिघांना अटक, 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी गाडीसह सुमारे २ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर आरोपी मुबारक गड्डे याला अटक करून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमन कलम ६५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 police seizes hand made liquor
Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! इलेक्ट्रिक बाईकमुळे १२ वाहनं भस्मसात, परिसरात अक्षरश: कोळसा, रहिवाशांमध्ये संतापाची लाट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com