इराणवर अणुहल्ला होणार का? ट्रम्प यांच्या धमकीनंतर मोठी अपडेट

Iran US conflict latest update : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणवर अणुहल्ला होणार का, अशी चर्चा रंगली होती. मात्र व्हाईट हाऊसने स्पष्ट केलं की अमेरिका इराणवर अणुहल्ला करणार नाही.

Iran US conflict latest update : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आज डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला शेवटचा इशारा दिला. "आज रात्रीत संपूर्ण सभ्यता नष्ट होऊ शकते," अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर अमेरिका इराणवर अणुहल्ला करणार का? अशी चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली होती. पण अमेरिकेतील व्हाईट हाऊसकडून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. अमेरिका इराणवर अणुहल्ला करणार नाही, असे स्पष्टीकरण व्हाईट हाऊसकडून देण्यात आले.

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. अमेरिकेकडून इशारा दिल्यानंतर इराणकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com