आधी डॉ. आंबेडकर अन् संविधानावर वक्तव्य केलं, नंतर किशोरी पेडणकरांनी माफी मागितली; नेमकं काय बोलून गेल्या? VIDEO

Kishori pednekar on dr babasaheb ambedkar : किशोरी पेडणकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. माजी महापौर किशोरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वक्तव्य केल्याने किशोरी पेडणेकर वादात सापडल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 'मनाचे श्लोकाचा प्रभाव होता, त्यामुळेच त्यांनी संविधान दिलं, असं वादग्रस्त वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी माफी मागितली. किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. 'असे संशोधन कोणत्या पुस्तकात झाले? याबाबत खुलासा करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com