सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या पेरियार यांच्या विचारांवर उभा राहिलेला विजय थलपती यांचं आयुष्य जन्मापासूनच नाट्यमय घडामो़डींनी भरलंय. विजयचे वडील ख्रिश्चन असून आई हिंदू आहे. 2022 मध्ये आलेल्या “सयम” चित्रपटाच्या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत विजयचे वडील आणि दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर यांनी एक खास किस्सा सांगितलाय.
त्यांनी सांगितले की, समाजात जातीवादाची बीजं कशी लहानपणापासूनच आणि तीही शाळांमधून पेरली जातात. यानंतर त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील सर्वांनाच धक्का देणारा अनुभव शेअर केला. जेव्हा ते आपल्या मुलाला म्हणेज अभिनेता थलपती विजयला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी गेले, तेव्हा प्रवेश फॉर्ममध्ये धर्म आणि जात लिहिण्याचा कॉलम होता. त्या वेळी त्यांनी “जात” या जागी “तमिळ” असे लिहिले. पण शाळा प्रशासनाने तो फॉर्म स्वीकारण्यास नकार दिला.
हे ऐकताच चंद्रशेखर यांनी ठाम भूमिका घेतली. त्यांनी शाळेला स्पष्ट इशारा दिला की, जर त्यांचा फॉर्म स्वीकारला गेला नाही, तर ते आंदोलन करतील—आणि गरज पडली तर शाळाही बंद पाडतील. शेवटी शाळेला माघार घ्यावी लागली आणि फॉर्म स्वीकारण्यात आला. त्या दिवसानंतर, थलपती विजयच्या सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये—जिथे जिथे जात नमूद करावी लागते—तिथे “तमिळ” असेच लिहिले जाते. चंद्रशेखर यांनी यावर भर देत सांगितले की, आपणच जातिवादाला महत्त्व देतो. जर आपण ठरवलं, तर मुलांच्या शाळेच्या प्रवेशावेळी जात नमूद करणं टाळू शकतो.
त्यांच्या मते, जर असं सातत्याने केलं, तर पुढील 20 वर्षांत जातप्रथा संपुष्टात येऊ शकते. या संवादात त्यांनी “विजय” या नावामागची गोष्टही सांगितली. त्यांच्या मते, “विजय” या नावात एक सकारात्मक ऊर्जा आहे. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक जोडी सलीम-जावेद आपल्या अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या भूमिकांसाठी “विजय” हे नाव वापरत असत. त्याच परंपरेतून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या मुलाचं नाव “विजय” ठेवलं. जात-धर्मापेक्षा तमिळ अस्मितेला सर्वोच्च मानणाऱ्या याच विजयनं आता तामिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक राजकीय बदल घडवून आणलाय. गेल्या साठ वर्षांपासून सुरू असलेल्या डीएमके आणि एआयडीएमकेच्या राजकारणात त्याने नवा पक्ष, नवी दिशा आणि एका नव्या युगाची सुरूवात केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.